सुदृढ लोकशाहीसाठी दिव्यांगांचे मतदान आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 10:22 PM2018-12-03T22:22:32+5:302018-12-03T22:22:56+5:30

भारताने संविधान स्वीकारले, तेव्हाच भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार बहाल झाला. यामध्ये महिला, पुरूष अंपग, वृध्द असा कोणताही भेदभाव न करता अधिकार प्रदान करण्यात आला आहे. लोकशाही सुदृढ होण्यासाठी दिव्यांग मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.

Legislative voting requires a healthy democracy | सुदृढ लोकशाहीसाठी दिव्यांगांचे मतदान आवश्यक

सुदृढ लोकशाहीसाठी दिव्यांगांचे मतदान आवश्यक

Next
ठळक मुद्देमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे प्रतिपादन : दिव्यांग दिनानिमित्त लोकशाही व मतदानाबाबत जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भारताने संविधान स्वीकारले, तेव्हाच भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार बहाल झाला. यामध्ये महिला, पुरूष अंपग, वृध्द असा कोणताही भेदभाव न करता अधिकार प्रदान करण्यात आला आहे. लोकशाही सुदृढ होण्यासाठी दिव्यांग मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.
जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जागतिक अपंग दिनाच्या औचित्याने सर्व अपंग बांधवांना मतदान करण्याकरिता जागृतीसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षीय भाषण करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, तहसीलदार दयाराम भोयर, सुखदेव वासनिक, नायब तहसीलदार सुनील चडगुलवार आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना राठोड म्हणाले की, मतदार यादीत नाव नसल्याचे दिव्यांग मतदारांनी खात्री करून घ्यावी. नाव नसेल तर ६ क्रमांकाचा अर्ज भरून जन्माचा दाखला, एक रंगीत पासपोर्टसाईज फोटो आपल्या तहसील कार्यालयात किंवा तलाठी यांच्याकडे सादर करावा, १५ डिसेंबरपर्यंत मतदार यादीत आपले नाव नोंदविता येणार आहे. लोकशाही प्रक्रियेत एक मतदान सुध्दा अत्यंत महत्त्वाचे आहे. याची जाणीव ठेवून मतदान करावे, असे आवाहन डॉ. यांनी केले.
संचालन सुनील चडगुलवार तर आभार सुखदेव वासनिक यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाप्रसंगी नवीन दिव्यांग मतदारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
मतदान केंद्रांवर राहणार रॅमची व्यवस्था
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आपली मदत करण्याकरिता मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी आपणास मदत करतील. प्रत्येक मतदान केंद्रावर आपली तीनचाकी सायकल चालविण्यासाठी रॅमची सुविधा केली आहे. दिव्यांग मतदारांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दखल घेतली आहे, अशी माहिती अधिकाºयांनी दिली.

Web Title: Legislative voting requires a healthy democracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.