चामोर्शीत विकास कामांचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 11:57 PM2018-03-12T23:57:42+5:302018-03-12T23:57:42+5:30

चामोर्शी येथे कृउबास व तालुका विक्री संघाच्या निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध विकास तथा मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.

Launch of Chamber Development Works | चामोर्शीत विकास कामांचे लोकार्पण

चामोर्शीत विकास कामांचे लोकार्पण

Next
ठळक मुद्देकृउबास व खरेदी विक्री संघाचा पुढाकार : संरक्षक भिंत, धरमकाटा, गोदाम, शेतकरी माल साठवणूक केंद्र उपलब्ध

आॅनलाईन लोकमत
चामोर्शी : चामोर्शी येथे कृउबास व तालुका विक्री संघाच्या निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध विकास तथा मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य अतुल गण्यारपवार होते. प्रमुख अतिथी म्हणून रासपचे महासचिव बाळासाहेब दोडतले, महिला आघाडीच्या उपाध्यक्ष माधुरी पालीवाल, पूर्व विदर्भ सचिव संजय कन्नावार, विदर्भ अध्यक्ष मनोज साबळे, पूर्व विदर्भ सहकार आघाडीचे राजू झरकर, व्यापारी संघ अध्यक्ष गौतम गुंदेजा, दुग्ध विकास भंडाराच्या संचालिका निमा हलमारे, रासप प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. गजानन चौगुले, अ‍ॅड. अभिजीत ऋषी, कृउबासचे उपसभापती प्रेमानंद मल्लिक, तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष गुरूदास चुधरी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अमोल गण्यारपवार, बंडूजी ऐलावार, निबंधक डी. टी. सरपाते, मुरलीधर बुरे, उद्योजक जयसुखलाल दोषी आदी उपस्थित होते.
कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत २ कोटी ३८ लाख रूपयांच्या स्व:निधीतून शेतकºयांसाठी थंड पाण्याची मशीन बसविण्यात आली आहे. त्याचबरोबर संरक्षण भिंत, धर्मकाटा, गोदामाचे नूतनीकरण, शेतकरी माल साठवणूक केंद्र यांचे लोकार्पण करण्यात आले. ५५ लाखांच्या ओपन शेडचे भूमीपूजन केले. यामुळे शेतकºयांना सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत. चामोर्शी तालुका खरेदी विक्री संघाच्या तीन कोटीच्या निधीतून स्व. भैय्याजी पाटील दीक्षित शॉपींग कॉम्प्लेक्सचे भूमीपूजन करण्यात आले. लवकरच कामाला सुरूवात होणार आहे.
कार्यक्रमाला संचालक अरूण बंडावार, गोसाई, सातपुते, सुधाकर निखाडे, जानकीराम कुसनाके, शंकर वंगावार, विनायक आभारे, गणपती भंडारे, रामचंद्र ब्राह्मणकर, निलेश गद्देवार, बाजीराव गावडे, सतीश रॉय, चंद्रकांत दोषी, शामराव लटारे, अनिल नैताम, कौशल्याबाई पोरटे, बयनाबाई मडावी, राजू खापरे, निरज राजकोंडावार, गोपाल पिपरे, अरूण बंडावार, शामराव पोरटे, नामदेव सोनटक्के, अरूण लाकडे, साईनाथ पेशट्टीवार, मंजुषा चलकलवार, सरोज कोंडूकवार, व्यवस्थापक बबनराव श्रीकुंटवार, राजू आत्राम, संजय श्रुंगारपवार, दीपक तातावार, प्रशांत कोडगीरवार आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक विजय गोरडवार यांनी केले. संचालन निलेश गद्देवार तर आभार प्रा. मनोज नागोसे यांनी केले. यावेळी नामदार महादेव जाणकर व अतुल गण्यारपवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नागरिक उपस्थित होते.

Web Title: Launch of Chamber Development Works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.