महिला परिचरांचे विधिमंडळावर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 01:21 AM2018-11-28T01:21:33+5:302018-11-28T01:22:32+5:30

मानधनात वाढ करावी, या मुख्य मागणीसाठी राज्यभरातील अंशकालीन स्त्री परिचर विधिमंडळावर बुधवारी धडक देणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यातीलही शेकडो महिला परिचर या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

Inspect women councils on the legislature | महिला परिचरांचे विधिमंडळावर धरणे

महिला परिचरांचे विधिमंडळावर धरणे

Next
ठळक मुद्देमानधनात वाढ करा : जिल्ह्यातून जवळपास ६० कर्मचारी जाणार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मानधनात वाढ करावी, या मुख्य मागणीसाठी राज्यभरातील अंशकालीन स्त्री परिचर विधिमंडळावर बुधवारी धडक देणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यातीलही शेकडो महिला परिचर या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
आरोग्य सेविकेसोबत आरोग्य सेवा देण्याचे महत्त्वाचे काम अंशकालीन स्त्री परिचर करते. शासनामार्फत राबविण्यात येणारे आरोग्यविषयक कार्यक्रम, लसीकरण यामध्ये अंशकालीन स्त्री परिचर अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडते. मात्र या कर्मचाऱ्यांना केवळ १२०० रूपये मानधन दिले जाते. वाढत्या महागाईमध्ये मानधन अतिशय कमी आहे. मानधनात वाढ करावी, यासाठी संघटनेच्या मार्फत यापूर्वी अनेकदा आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. मात्र शासन मानधनात वाढ करण्यास तयार नाही. महिला परिचरांना किमान सहा हजार रूपये मानधन देण्यात यावे, याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाने आरोग्य विभागाला पाठविला आहे. वित्त विभागाने आरोग्य विभागाकडून प्रस्ताव मागवून मंजुरी द्यावी, अशी मागणी महिला परिचर संघटनेने केली आहे. विधी मंडळावरील आंदोलनात सहभागी कर्मचाºयांचे नेतृत्व नर्सेस संघटनेच्या अध्यक्ष माया सिरसाट, महिला परिचर संघटनेच्या अध्यक्ष माधुरी मेश्राम, सचिव साबेरा शेख या करणार आहेत.
आंदोलनासाठी गडचिरोली जिल्ह्यातून जवळपास ६० महिला परिचर रवाना झाल्या आहेत.

Web Title: Inspect women councils on the legislature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.