रानभाज्यांचे विविध प्रकार बघून मान्यवर अवाक्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:15 AM2019-07-13T00:15:36+5:302019-07-13T00:16:05+5:30

कृषी विज्ञान केंद्र सोनापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या जांभूळ व रानभाजी महोत्सवात सुमारे २८ प्रकारच्या रानभाज्या ठेवण्यात आल्या होत्या. विविध प्रकारातील रानभाज्या बघून शहरातील नागरिकांसह पालकमंत्रीही अवाक् झाले.

Given the different types of gardens, | रानभाज्यांचे विविध प्रकार बघून मान्यवर अवाक्

रानभाज्यांचे विविध प्रकार बघून मान्यवर अवाक्

googlenewsNext
ठळक मुद्देजांभूळ व रानभाजी महोत्सव : छोटे उद्योग स्थापन करण्याचे मार्गदर्शकांचे महिलांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कृषी विज्ञान केंद्र सोनापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या जांभूळ व रानभाजी महोत्सवात सुमारे २८ प्रकारच्या रानभाज्या ठेवण्यात आल्या होत्या. विविध प्रकारातील रानभाज्या बघून शहरातील नागरिकांसह पालकमंत्रीही अवाक् झाले.
गडचिरोलीच्या जंगलात विविध प्रकारच्या रानभाज्या आढळतात. ज्या ऋतूत जे फळ व भाजी निघते, ते त्या कालावधीत आरोग्यासाठी लाभदायी असते, असे वर्णन आयुर्वेदात आहे. रानभाज्या या कोणत्याही कीटकनाशक व रासायनिक खताविना वाढतात. तसेच रानभाज्यांसाठी कोणताही लागवड खर्च येत नाही. केवळ त्या गोळा करण्यासाठी जंगलात जावे लागते. रानभाज्यांचे महत्त्व नागरिकांना कळावे, यासाठी कृषी विज्ञान केंद्र सोनापूर, कृषी महाविद्यालय, कृषी संशोधन केंद्र आत्मा, माविम, उमेद, वन विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीद्वारा १२ जुलै रोजी कृषी महाविद्यालयात जांभूळ व रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
महोत्सवाचे उद्घाटन वित्त, नियोजन, वनमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार अशोक नेते, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ. डी. एम. मानकर, कृषी महाविद्यालयाचे डॉ. एस. डी. अमरशेट्टीवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. संदीप कराडे, डॉ. योगीता सानप आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, जांभूळ हे अल्पायुषी आहे. त्यावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करणे गजरेचे आहे. जांभळात औषधी गुणधर्म असल्याने जांभूळ रस, सुपारी, जाम, जेली, लादू, चॉकलेट, आईसक्रिम असे छोटे उद्योग उभारून महिला बचत गटांनी सक्षम होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी डॉ. डी. एम. मानकर, डॉ. एस. बी. अमरशेट्टीवार, डॉ. संदीप कराडे यांनीही मार्गदर्शन केले.
जांभूळ निष्कासन यंत्राचे वितरण
कार्यक्रमादरम्यान वंदना महिला बचत गट गिलगाव व जिजामाता महिला शेतकरी स्वयंसहायता गट जिमलगट्टा या दोन गटांना जांभूळ बिज निष्कासन यंत्राचे वितरण करण्यात आले. बचत गटांमार्फत रानभाजी व जांभळांपासून तयार करण्यात आलेले विविध पदार्थ विक्रीकरीता ठेवण्यात आले होते. मान्यवर तसेच नागरिकांनी स्टॉलला भेट देऊन पाहणी केली.

Web Title: Given the different types of gardens,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.