गडचिरोली कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:21 AM2018-09-29T00:21:28+5:302018-09-29T00:22:10+5:30

जिल्हा केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन तसेच गडचिरोली जनरल मर्चंट असोसिएशन यांनी शुक्रवारी गडचिरोली बंदचे आवाहन केले होते. या बंदला गडचिरोली शहरातील सर्वच दुकानदारांनी प्रतिसाद दर्शविला.

Gadchiroli cracked off | गडचिरोली कडकडीत बंद

गडचिरोली कडकडीत बंद

Next
ठळक मुद्देआॅनलाईन विक्रीला विरोध : केमिस्ट व मर्चंट असोसिएशनचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन तसेच गडचिरोली जनरल मर्चंट असोसिएशन यांनी शुक्रवारी गडचिरोली बंदचे आवाहन केले होते. या बंदला गडचिरोली शहरातील सर्वच दुकानदारांनी प्रतिसाद दर्शविला. औषधी दुकानांसह इतर सर्वच दुकाने बंद असल्याने गडचिरोली शहरात शुकशुकाट दिसून येत होता.
इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून आॅनलाईन औषधी विक्रीला सरकारने सकारात्मक प्रतिसाद दर्शविला आहे. आॅनलाईन औषधी विक्रीचे अनेक दुष्परिणाम आहेत. औषधी हा अतिशय संवेदनशील विषय असल्याने आॅनलाईन औषध विक्रीला अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने विरोध केला आहे. संघटनेच्या या निर्णयाला गडचिरोली जिल्हा केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनने पाठींबा दर्शवित शुक्रवारी सर्व औषधी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार औषधी दुकाने बंद ठेवण्यात आली होती. संघटनेने बंदबाबतची माहिती दोन दिवसांपूर्वीच दिली असल्याने ज्या नागरिकांना औषध आवश्यक आहे, त्यांनी अगोदरच औषधी खरेदी करून ठेवली. त्याचबरोबर अन्न व औषध प्रशासन विभागाने जिल्हाभरातील शासकीय रूग्णालये, सामान्य रूग्णालये, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, नगर परिषद यांच्या अधिनस्त असलेल्या रूग्णालयांमध्ये पुरेसा औषध साठा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाला पाठविण्यात आले.
यावेळी संघटनेचे सतीश विधाते, अविनाश धाईत, निलेश चन्नावार, विपुल चन्नावार, अविनाश कोमट, तुषार चन्नावार, विजय देवकुले, विशाल कुकडे, मदद जीवानी, दिलीप बंडावार, नितीन दोंतुलवार, गोविंद निरंकारी, राजेश इटनकर, दिनेश पुंडे, विजय चौधरी, किशोर म्हस्के, ओमप्रकाश नाकाडे आदी उपस्थित होते.
वस्तूंची आॅनलाईन विक्री केली जात असल्याने अनेक दुकानदारांना याचा फटका बसत आहे. एफडीआयचाही मोठा परिणाम दुकानदारांवर होणार आहे. या दोन निर्णयांचा विरोध म्हणून गडचिरोली जनरल मर्चंट असोसिएशननेही शुक्रवारी गडचिरोली बंदचे आवाहन केले होते. गडचिरोली जनरल मर्चंट असोसिएशनमध्ये किराणा, कापड, स्टेशनरी, हार्डवेअर, व्हेरायटी, धान्य दुकान, ईलेक्ट्रिक दुकान आदींचा समावेश होतो. संघटनेच्या आवाहनानंतर गडचिरोली शहरातील सर्वच दुकाने सकाळपासून बंद ठेवण्यात आली होती. या बंदला शहरातील पानठेलाधारकांनीही पाठींबा दर्शवित बंदमध्ये सहभाग नोंदविला. सर्वच दुकाने बंद असल्याने मुख्य बाजारपेठेत संचारबंदी लागल्यागत स्थिती निर्माण झाली होती.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधानांना पाठविले. बंद यशस्वी करण्यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष रवी चन्नावार, सचिव गुरूदेव हरडे, कोषाध्यक्ष फरीद नाथानी, सहसचिव मनोज ठाकूर, उपाध्यक्ष हरीश राठी, दिलीप सारडा, प्रफुल्ल बिजवे, हेमंत राठी, अनिल करपे, किशोर जोगे, उल्हास राठी, बबलू शर्मा, नरेंद्र चन्नावार, हिरानंद राठी, आनंद असावा, दयानंद चौधरी, कासम धंदानी, शौकत धमानी, मुन्ना लालानी, अनिल बालपांडे, सुनील हर्षे, दयानंद चौधरी, किशोर जोगे, विशाल हलवदीया, प्रफुल्ल आंबोरकर, शरफराज शेख, बबलु बरच्छा, अमित नंदा आदींनी सहकार्य केले.

ग्रामीण भागातील नागरिकांना फटका
गडचिरोली शहरातील दुकाने बंद असल्याबाबतची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांना नव्हती. त्यामुळे परिसरातील शेकडो नागरिक वस्तू खरेदीसाठी गडचिरोली येथे आले. मात्र दुकाने बंद असल्याचे बघून ते निराश झाले. सर्वच दुकाने बंद असल्याने नागरिकांना आल्यापावली परत जावे लागले. व्यापारी असोसिएशनच्या बंदला पाठींबा दर्शवित पानठेलाधारकांनी सुध्दा पानठेले बंद ठेवले होते. त्यामुळे खर्रा शौकीनांची चांगली अडचण झाली. शहरातील वस्ती भागात मात्र काही पानठेले सुरू होते.

Web Title: Gadchiroli cracked off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.