लहान वयापासूनच आर्थिक शिक्षण द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 11:57 PM2019-02-23T23:57:01+5:302019-02-23T23:57:31+5:30

मुलांना बचतीची सवय व बँकेचे व्यवहार या वयापासून समजू लागले आहे, हे उल्लेखनीय काम आहे. नुसती पैशाची बचत नाही तर पाणी, वीज, अन्न त्याचप्रमाणे विद्यार्थी जीवनापासून छोटे व्यवसाय करण्याची सवय मुलांना लागली, हे महत्त्वाचे आहे.

Financial education from an early age | लहान वयापासूनच आर्थिक शिक्षण द्या

लहान वयापासूनच आर्थिक शिक्षण द्या

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : शाळकरी मुलांसोबत साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मुलांना बचतीची सवय व बँकेचे व्यवहार या वयापासून समजू लागले आहे, हे उल्लेखनीय काम आहे. नुसती पैशाची बचत नाही तर पाणी, वीज, अन्न त्याचप्रमाणे विद्यार्थी जीवनापासून छोटे व्यवसाय करण्याची सवय मुलांना लागली, हे महत्त्वाचे आहे. यापुढेही विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच आर्थिक शिक्षण दिले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
शुक्रवार २२ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात परिसंवादाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शाळकरी मुलांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी सिंह बोलत होते. याप्रसंगी मंचावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, मेलजोलच्या कार्यकर्त्या संगीता मानसे, आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेचे प्रमुख डॉ.सतीश गोगुलवार आदी मान्यवर उपस्थित होते. आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडा, मेलजोल मुंबई व आयसीआयसी बँकच्या वतीने अफलातीन प्रकल्पाच्या माध्यमातून कोरची, कुरखेडा, आरमोरी, धानोरा व मुलचेरा तालुक्यातील ८५ व खासगी शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामाजिक व आर्थिक उद्योजकतेच्या उपक्रमाचे धडे देण्यात आले. मुलांना बचत ही संकल्पना शिकविण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या परिसंवादात सहभागी झालेल्या विद्यार्थी व शिक्षकांनी प्रकल्पाच्या माध्यमातून वर्षभरातील त्यांच्या शाळेत केलेल्या उल्लेखनीय कामांची मांडणी केली. आम्ही काय शिकलो, यावर जास्त भर देण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन प्रकल्प समन्वयक महेश लाडे यांनी केले तर आभार पूनम वासनिक यांनी मानले. यशस्वीतेसाठी अफलातील टीमच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

Web Title: Financial education from an early age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.