शेतकऱ्यांचा जीव भांड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 11:12 PM2018-06-27T23:12:43+5:302018-06-27T23:13:30+5:30

मंगळवारच्या मध्यरात्रीपासून बुधवारी सायंकाळपर्यंत गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात संततधार पावसाने हजेरी लावली. यामुळे मरणासन्न झालेल्या पऱ्ह्यांना जीवदान मिळाले आहे. यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे.

Farmers' lives | शेतकऱ्यांचा जीव भांड्यात

शेतकऱ्यांचा जीव भांड्यात

Next
ठळक मुद्देरात्रीपासून सरीवर सरी : करपण्याच्या स्थितीतील पºह्यांना जीवदान

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मंगळवारच्या मध्यरात्रीपासून बुधवारी सायंकाळपर्यंत गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात संततधार पावसाने हजेरी लावली. यामुळे मरणासन्न झालेल्या पऱ्ह्यांना जीवदान मिळाले आहे. यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे. बुधवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार बाराही तालुक्यात २४ तासात सरासरी १३.४ मिमी एवढा पाऊस झाल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन विभागाने घेतली आहे.
गडचिरोली तालुक्यासह चामोर्शी, अहेरी उपविभाग तसेच आरमोरी, वडसा, धानोरा ते कोरचीपर्यंत पाऊस बरसला. बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस सुरू होता.
वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी महिला भर पावसात घराबाहेर पडल्या. पावसातच त्यांनी विनातक्रार वडाच्या झाडाची पुजा केली.
अनेक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरद्वारे आपल्या शेतजमिनीत नांगरणी करून रोवणीयोग्य केली आहे. शेताच्या बांधावर पाळे टाकून तूर व तीळ पिकाची लागवड करण्यात आली. या पावसामुळे तूर व तिळाचे अंकूरही बाहेर निघाले आहेत. एकूणच सदर संततधार पावसाने शेतकऱ्यांसह जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे. वातावरणातील उकाडाही बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे.
धानपिकाचे पऱ्हे टाकल्याला आठ दिवसांचा कालावधी उलटला. मात्र पावसाचा पत्ता नव्हता. २७ जून रोजी सकाळपासून दुपारपर्यंत आरमोरी तालुक्याच्या वैरागड परिसरात जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंददायी वातावरण आहे. आर्द्रा नक्षत्र संपण्याच्या मार्गावर असताना पावसाचा पत्ता नव्हता. या भागातील अनेक ठिकाणचे पऱ्हे करपायला लागले होते. पऱ्हे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी धावपळ सुरू केली होती. दरम्यान बुधवारी झालेल्या संततधार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आता रोवणीच्या कामास सुरुवात होणार आहे. पावसामुळे जिल्ह्याच्या अनेक गावात अंतर्गत रस्त्यावर तसेच सखल भागात पाणी साचले आहे. शहरातील नाल्या पाण्याने वाहत आहेत. संततधार पावसामुळे नागरिकांना छत्र्यांचा आधार घ्यावा लागत आहे.
रोवणीस होणार सुरूवात
संततधार पावसाने शेतशिवारात पाणी साचले असून नदी, नाल्यांची पाणीपातळी वाढली आहे. या पावसामुळे करपण्याच्या मार्गावर असलेल्या धान पऱ्ह्यांना नवसंजीवनी मिळाली आहे. आतापर्यंत पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी वर्ग आता खत जुळविणीपासून रोवणीच्या तयारीच्या कामाला जोमाने भिडला आहे. हा पाऊस दोन दिवस कायम राहिल्यास येत्या लवकरच जिल्ह्यात धानपीक रोवणीच्या कामास प्रारंभ होणार आहे.

Web Title: Farmers' lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.