मार्कंडा येथे भाविकांसाठी सोईसुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 01:17 AM2018-02-14T01:17:53+5:302018-02-14T01:19:12+5:30

श्रीक्षेत्र मार्कंडादेव येथे भरलेल्या महाशिवरात्री यात्रेसाठी जिल्हा परिषद यात्रा निधीतून प्राप्त झालेल्या १ लाख ७५ हजार रूपये मिळाले. तसेच मार्कंडादेव ग्राम पंचायतीला राज्य शासनाकडून १ लाख ६१ हजार रूपये इतके अनुदान तीन वर्षाचे मिळून प्राप्त झाले.

Convenience for the devotees at Markanda | मार्कंडा येथे भाविकांसाठी सोईसुविधा

मार्कंडा येथे भाविकांसाठी सोईसुविधा

Next
ठळक मुद्देपिण्याचे पाणी, अांघोळीसाठी शॉवर व अन्य सुविधा : ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाचा पुढाकार

ऑनलाईन लोकमत
चामोर्शी : श्रीक्षेत्र मार्कंडादेव येथे भरलेल्या महाशिवरात्री यात्रेसाठी जिल्हा परिषद यात्रा निधीतून प्राप्त झालेल्या १ लाख ७५ हजार रूपये मिळाले. तसेच मार्कंडादेव ग्राम पंचायतीला राज्य शासनाकडून १ लाख ६१ हजार रूपये इतके अनुदान तीन वर्षाचे मिळून प्राप्त झाले. या निधीतून सदर यात्रेमध्ये भाविक व व्यावसायिकांसाठी विविध सोईसुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.
पंचायत समिती प्रशासनातर्फे भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फराडा-फोकुर्डी बसस्टॉप रोडवर एक हजार लिटरच्या पाणी टाकीची व्यवस्था, स्टँड पोस्ट व्यवस्था, नदी किनाऱ्यावर भाविकांसाठी आंघोळीकरिता शॉवर व्यवस्था, महिलांसाठी नदी किनाºयावर चेजिंग रूम, महिलांसाठी मुत्रिघराची व्यवस्था करण्यात आली आहे. पं. स. प्रशासनातर्फे नदी किनाऱ्यावर व नदीपात्राचे स्वच्छता करण्यात आली आहे. यात्रा परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. यात्रा परिसरात २० तात्पूरते मुत्रिघर, ५० शौचालयालयाची स्वच्छता व्यवस्था, व्यावसायिकांसाठी रोडलगत जागा आखून देण्यात आली आहे. यासाठी २० ग्रामसेवकांची यात्रा व्यवस्थापनासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
बीडीओ गोविंद खामकर यांच्या मार्गदर्शनात यात्रा अधीक्षक डी. पी. भोगे हे यात्रेतील सोयीसुविधांकडे लक्ष ठेवून आहेत.
१ लाख ६१ हजारातून सुविधा
मार्कंडा देव ग्राम पंचायतीला यात्रा काळातील सोयीसुविधांसाठी राज्य शासनाकडून तीन वर्षांचे मिळून एकूण १ लाख ६१ हजार रूपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. या निधीतून ग्रा. पं. प्रशासनाने यात्रेतील भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याच्या जलशुद्धीकरण यंत्राची दुरूस्ती करण्यात आली. गावातील संपूर्ण पथदिवे सुरळीत करण्यात आले. आवश्यक त्या ठिकाणी नळजोडणी करण्यात आली. नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या सर्व सोयीसुविधांवर शासनाकडून प्राप्त झालेला हा निधी खर्च केला जात आहे, अशी माहिती मार्र्कंडादेवच्या सरपंच उज्ज्वला गायकवाड, सचिव दिनेश सराटे यांनी दिली आहे. भाविकांना सोयीसुविधा पुरवून संपूर्ण यात्रा व्यसनमुक्त करण्यासाठी ग्रा. पं. प्रशासनाने यंदा पुढाकार घेतला आहे.

Web Title: Convenience for the devotees at Markanda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.