मार्र्कं डेश्वरांची मुख्य पूजा पालकमंत्र्यांच्या हस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 11:08 PM2018-02-05T23:08:33+5:302018-02-05T23:08:53+5:30

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त १३ फेब्रुवारीपासून जत्रा भरणार आहेत.

The Chief Pooja of Markandeshwar at the hands of guardian | मार्र्कं डेश्वरांची मुख्य पूजा पालकमंत्र्यांच्या हस्ते

मार्र्कं डेश्वरांची मुख्य पूजा पालकमंत्र्यांच्या हस्ते

Next
ठळक मुद्देट्रस्टतर्फेही तयारी : यात्रेकरूंचे जत्थे दाखल

आॅनलाईन लोकमत
मार्र्कं डादेव : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त १३ फेब्रुवारीपासून जत्रा भरणार आहेत. १३ फेब्रुवारीला येथे राज्याचे आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते पहाटे ४ वाजता मार्र्कंडेश्वरांची मुख्य पूजा होणार आहे, अशी माहिती मार्र्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर व सचिव मृत्यूंजय गायकवाड यांनी दिली आहे.
आठ दिवसांनंतर मार्र्कंडादेव येथील यात्रेला सुरूवात होणार असली तरी व्यावसायिकांनी आत्तापासूनच आपले बिऱ्हाड मांडणे सुरू केले आहे. ट्रस्टतर्फे भाविकांसाठी विविध सोयी पुरविल्या जाणार आहेत

Web Title: The Chief Pooja of Markandeshwar at the hands of guardian

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.