बोरमाळा नदी घाट मार्ग धुळीने माखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:56 AM2018-05-21T00:56:54+5:302018-05-21T00:56:54+5:30

 Borkala river crossing route makhla with dust | बोरमाळा नदी घाट मार्ग धुळीने माखला

बोरमाळा नदी घाट मार्ग धुळीने माखला

Next
ठळक मुद्देधोकादायक खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता : सातत्याने मागणी होऊनही कामास मंजुरी नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा मुख्यालयातील आठवडी बाजारातून बोरमाळा नदी घाटाकडे मार्ग जातो. वैनगंगा नदी पलीकडे बोरमाळा, विहिरगाव, गेवरा व सावली तालुक्यातील अनेक गावे आहेत. गडचिरोली हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने या भागातील अनेक नागरिक दररोज सदर मार्गाने गडचिरोलीकडे ये-जा करतात. मात्र बोरमाळा नदी घाटाकडे जाणारा रस्ता पूर्णत: धुळीने माखला आहे. यामुळे सदर मार्गावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. परिणामी या मार्गावर अपघाताची शक्यता वाढली आहे.
सदर मार्गावर नगर पालिकेच्या नळ योजनेचे जलशुध्दीकरण केंद्रही आहे. नदी काठावर इनटेक वेल व पाणी टाकी उभारण्यात आली आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्यात काही अडथळा निर्माण झाल्यास पालिकेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी सदर मार्गानेच जाऊन नळ योजनेची समस्या जाणून घेतात. मात्र गडचिरोली पालिकेचेही सदर मार्गाच्या पक्क्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. सध्या उन्हाळा असल्याने वैनगंगा नदी पलिकडील व गडचिरोली परिसरातील अनेक नागरिक थेट व सोयीचा मार्ग म्हणून याच मार्गाचा उपयोग करतात. मात्र सदर मार्गाची प्रचंड दुरवस्था झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात गडचिरोली शहरातील अनेक युवक व नागरिक सदर वैनगंगा नदी घाटावर जाऊन आंघोळ करतात. काही लोक पोहण्याचा सरावही करतात. मात्र या मार्गाची दुरवस्था झाली असल्याने लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. सदर मार्गाची पक्की दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने होत आहे. मात्र प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी या मार्गाच्या दुरूस्तीकडे कमालीचे दुर्लक्ष केले आहे.

भाजीपाला विक्रेते व मजुरांची पंचाईत
वैनगंगा नदी पलिकडील बोरमाळा परिसरात अनेक शेतकरी भाजीपाला पिकाची लागवड करतात. गडचिरोली जिल्हा मुख्यालयाचा बाजार जवळ असल्याने आठवडी बाजाराच्या दिवशी तसेच दैनंदिन गुजरीतही हे शेतकरी व्यापाऱ्यांना भाजीपाला विक्री करतात. मजुरही याच मार्गाने येतात.

Web Title:  Borkala river crossing route makhla with dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.