तीन दारूविक्रेत्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 01:22 AM2018-09-08T01:22:30+5:302018-09-08T01:22:46+5:30

दारू बंदी नुसती घोषित करून ती टिकत नाही. त्याची योग्य अंमलबजावणी झाली तरच ती टिकते व गावातील लोकांना दारू बंद केल्याचा फायदा मिळतो. अशीच दारू बंदीची अंमलबाजावणी मुडझा बूज गावात करण्यात आली.

Action on three liquor vendors | तीन दारूविक्रेत्यांवर कारवाई

तीन दारूविक्रेत्यांवर कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देदारू निर्मितीचे साहित्य केले नष्ट : मुडझा बुज येथे गाव संघटनेच्या महिलांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दारू बंदी नुसती घोषित करून ती टिकत नाही. त्याची योग्य अंमलबजावणी झाली तरच ती टिकते व गावातील लोकांना दारू बंद केल्याचा फायदा मिळतो. अशीच दारू बंदीची अंमलबाजावणी मुडझा बूज गावात करण्यात आली. मुडझा बूज येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या पुढाकाराने गावातील तीन दारू विक्रेत्यांची दारू व दारूनिर्मितीचे साहित्य पकडून त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात आली.
मुक्तिपथ तालुका कार्यालय गडचिरोलीच्या वतीने गावसंघटनेच्या दोन बैठका घेण्यात आल्या. त्यावेळी गावात दारू विक्री बंद करण्याबाबत काय कृती करता येईल यासाठी चर्चा करण्यात आली. दारू विक्री बंदी घोषित करण्यात आली होती, परंतु बंदीची अंमलबजावणी करणे गरजेचे होते. महिला व युवकांनी ते काम हाती घेतले व गावातील दारू विक्रेत्यांच्या घरी धाडी टाकल्या. गाव संघटनेने ४ सप्टेंबरला एका दारू विक्रेत्याच्या घरी धाड टाकून १० देशी दारूच्या निपा पकडल्या. पोलीस ठाणेदार दीपरत्न गायकवाड यांनी येऊन कारवाई केली. परंतु तोपर्यंत दारू विक्रेता पळून गेला. दारू विक्रेत्याला सकाळपर्यंत पोलीस स्टेशन मध्ये हजर करावे, असे पोलीस ठाणेदारांनी विक्रेत्याच्या घरच्यांना सांगितले व फरार आरोपी म्हणून गुन्हा नोंद केला.
त्यानंतर ६ सप्टेंबर रोजी गाव संघटनेने दुसऱ्या एका दारू विक्रेत्याकडून ५ लिटर मोहाची प्लास्टिक पिंप पकडली तर आणखी एका विक्रेत्या कडून १ मडके मोहाचा साठा नष्ट केला. पोलीस बीट जमादार मुनेश्वर मेश्राम यांनी दोन्ही विक्रेत्यांना पकडून अटक केली व गुन्हा दाखल केला.
दारू विक्री बंद करण्यासाठी गावातील लोचन मेश्राम, पोर्णिमा बारशिंगे, सुषमा निकुरे, कौशल्याबाई कांबळे, प्रीती बारशिंगे, नंदाबाई मेश्राम, प्रमोद उमरगुंडावार, किशोर सोनुले, भैयाजी चौधरी, तुळशीराम गडपायले , भास्कर टिंगुसले, अनीत सुदराम यांचा सक्रीय सहभाग होता. महिलांच्या पुढाकारामुळे दारूविक्रेत्यांवर कारवाई झाली.

Web Title: Action on three liquor vendors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.