भामरागडात ४३ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:34 AM2018-02-23T00:34:43+5:302018-02-23T00:35:07+5:30

सांज मल्टी अ‍ॅक्टीव्हीटी डेव्हल्पमेंट इन्स्टिट्यूट इंटर एरिया बिनागुंडा व उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड यांच्या संयुक्त विद्यमाने २० फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

43 blood donation in Bhamrangad | भामरागडात ४३ जणांचे रक्तदान

भामरागडात ४३ जणांचे रक्तदान

Next
ठळक मुद्देपोलीस विभाग व सांज मल्टी अ‍ॅक्टीव्हिटी संस्थेचा उपक्रम

ऑनलाईन लोकमत
भामरागड : सांज मल्टी अ‍ॅक्टीव्हीटी डेव्हल्पमेंट इन्स्टिट्यूट इंटर एरिया बिनागुंडा व उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड यांच्या संयुक्त विद्यमाने २० फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात ४३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तसंकलन करण्याकरिता उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथील डॉ. कुरेशी व त्यांची चमू उपस्थित होती. ताडगाव पोलीस स्टेशनमधील २२, उपविभागीय कार्यालय भामरागड येथील १५ व पोलीस स्टेशन धोडराज येथील सहा अशा एकूण ४३ पोलिसांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना संस्थेचे अध्यक्ष रूपलाल गोंगले यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले. यशस्वीतेसाठी सुमित मेश्राम, विजय हलदार, संदीप धानोरकर, रतन बिश्वास, अलविश अल्का, सतीश उईके, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे उपस्थित होते. संपूर्ण रक्त अहेरी उपजिल्हा रुग्णालयात जमा करण्यात आले. भामरागड येथे रक्तपेढी देण्याची मागणी आहे.

Web Title: 43 blood donation in Bhamrangad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.