३६ जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 01:30 AM2018-06-30T01:30:09+5:302018-06-30T01:30:42+5:30

१ जुलै रोजी डॉक्टर डे निमित्त डॉक्टर संघटनांतर्फे गडचिरोली शहरासह जिल्हाभरात विविध कार्यक्रम होणार आहेत. डॉक्टर डेच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली असोसिएशन आॅफ मेडिकल प्रॅक्टिश्नर (गॅम) व महाराष्ट्र स्टेट मेडिसिन रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन गडचिरोलीच्या वतीने ....

36 donated blood donation | ३६ जणांनी केले रक्तदान

३६ जणांनी केले रक्तदान

Next
ठळक मुद्दे‘डॉक्टर्स डे’निमित्त शिबिर : मेडिकल प्रॅक्टिश्नर असोसिएशनचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : १ जुलै रोजी डॉक्टर डे निमित्त डॉक्टर संघटनांतर्फे गडचिरोली शहरासह जिल्हाभरात विविध कार्यक्रम होणार आहेत. डॉक्टर डेच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली असोसिएशन आॅफ मेडिकल प्रॅक्टिश्नर (गॅम) व महाराष्ट्र स्टेट मेडिसिन रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन गडचिरोलीच्या वतीने शुक्रवारी येथील चामोर्शी मार्गावरील मार्र्कंडेय हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात डॉक्टर, औषधविक्रेत्यांसह जवळपास ३६ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला.
रक्तदान शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी प्रामुख्याने गॅम संघटनेचे अध्यक्ष डॉ.आर.डी.मुनघाटे, सचिव डॉ.अद्वय अप्पलवार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सचिन हेमके, मेडिकलचे संचालक तथा नगरसेवक सतीश विधाते, डॉ.चेतन कोवे, डॉ.प्रांजली आर्इंचवार आदी उपस्थित होते. सदर आरोग्य शिबिरात जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सचिन हेमके यांच्यासह बालरोगतज्ज्ञ डॉ.प्रशांत चलाख, डॉ.किशोर वैद्य, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ.लालाजी वट्टी, महेश येरोजवार, अरूण पगडपल्लीवार, महिला व बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.जयंत पर्वते, डॉ.पंकज सकिनलावार, अतुल हाडगे, तुषार चन्नावार, डॉ.उमेश समर्थ, वैभव कोपुलवार, सचिन पाटील, प्रज्वल मल्लेलवार, राहुल मंगर, राकेश वाटेकर, छोटू यादव, डॉ.वैशाली चलाख, अविनाश धाईत, आशिष बुरे, राजकुमार गोलदार, शांतीभूषण दुधे, डॉ.उनाडकाट, डॉ.तुषार डहाके, डॉ.बोदेले आदींसह ३६ जणांनी रक्तदान केले.
सदर रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ.शैलेजा मैंदमवार यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश तडकलावार यांच्यासह रक्ततंत्रज्ञ, कर्मचारी तसेच मार्र्कंडेय हॉस्पिटलच्या महिला कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
गडचिरोली असोसिएशन आॅफ मेडिकल प्रॉक्टिश्नर (गॅम) व महाराष्टÑ स्टेट मेडिसिन रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन गडचिरोलीच्या वतीने डॉक्टर डे निमित्त दरवर्षी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर व इतर लोकोपयोगी उपक्रम राबविले जातात. यंदा २६ जून रोजी सदर संघटनेच्या वतीने चामोर्शी तालुक्याच्या पावीमुरांडा परिसरातील मुतनूर येथे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले.
आज आरोग्यावर जनजागृती सायकल रॅली
डॉक्टरांच्या गॅम संघटनेतर्फे डॉक्टर डे निमित्त २९ जून ते १ जुलै या तीन दिवसांच्या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन गडचिरोली शहरात करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी शुक्रवारला रक्तदान शिबिर पार पडले. शनिवारी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच गडचिरोली शहरात सायकल रॅली काढून डॉक्टर नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणार आहेत.१ जुलै रोजी रविवारला सकाळी डॉक्टरांच्या दोन संघामध्ये जिल्हा स्टेडियमवर फुटबॉलचा सामना होणार आहे. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम व डॉक्टर डे चा समारोपीय कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला डॉक्टर, औषधविक्रेते, एमआर व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आहे.

Web Title: 36 donated blood donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.