१.३० लाखांचे सागवान जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 11:06 PM2017-11-11T23:06:41+5:302017-11-11T23:06:53+5:30

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सिरोंचा वन परिक्षेत्राच्या अधिनस्त असलेल्या कारसपल्ली उपक्षेत्रातील निमलगुड्डम गावानजीकच्या जंगलात उपविभागीय वनाधिकारी व त्यांच्या सहकारी कर्मचाºयांनी धाड टाकून....

1.30 lakh jewelers seized | १.३० लाखांचे सागवान जप्त

१.३० लाखांचे सागवान जप्त

Next
ठळक मुद्देनिमलगुड्डम जंगलात कारवाई : वनतस्कर पसार

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सिरोंचा वन परिक्षेत्राच्या अधिनस्त असलेल्या कारसपल्ली उपक्षेत्रातील निमलगुड्डम गावानजीकच्या जंगलात उपविभागीय वनाधिकारी व त्यांच्या सहकारी कर्मचाºयांनी धाड टाकून तब्बल १ लाख ३० हजार रूपये किमतीच्या २.६३० घनमीटरच्या सागवान पाट्या जप्त केल्या. सदर कारवाई ६ नोव्हेंबर रोजी सोमवारला करण्यात आली.
निमगलगुड्डम गावानजीकच्या जंगलात सागवान माल दडवून ठेवल्याची गुप्त माहिती सिरोंचाचे उपविभागीय वनाधिकारी शंकर गाजलवार यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सिरोंचा वन परिक्षेत्राचे वन कर्मचारी मर्रीगुडम-सिरकोंडा रस्त्याच्या बाजुने गस्त घालीत खंड क्रमांक १२ च्या जंगलात पोहोचले. यावेळी तेथे सागवान सिलपाट आढळून आले. वन कर्मचारी येत असल्याची चाहूल लागताच वन तस्कर घटनास्थळावरून पसार झाले. जवळपासच्या परिसरात पाहणी केली असता, एकूण पाच ठिकाणी सागवान माल दडवून ठेवल्याचे आढळून आले. घटनास्थळावर कोणीही इसम तसेच वाहन आढळून आले नाही. संपूर्ण सागवान पाट्या एकत्र करून मालाची मोजमाप केले असता, एकूण ३९ नग सागवान सिल पाट्या आढळून आल्या. १ हजार ३० रूपये किमतीच्या २.६३० घनमीटर एवढ्या सागवान पाट्या जप्त करण्यात आल्या. मोका पंचनामा व जप्ती नामा नोंदवून संपूर्ण माल सिरोंचा वन परिक्षेत्र कार्यालयात जमा करण्यात आला. सदर घटनेबाबत अज्ञात वन तस्करावर वन गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी कारसपल्लीचे क्षेत्र सहायक एस. एस. येनगंटीवार करीत आहेत.
सदर कारवाई सिरोंचाचे उपविभागीय वनाधिकारी शंकर गाजलवार, सिरोंचाचे वन परिक्षेत्राधिकारी जी. बी. दुर्गे, क्षेत्र सहायक एस. एस. येनगंटीवार, वनरक्षक ए. आर. बुध्दावार, वनरक्षक के. वाय. सहारे, पी. के. कोठारे यांच्यासह रोजंदारी वनमजुरांनी पार पाडली.

Web Title: 1.30 lakh jewelers seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.