राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत कामठीचा रब्बानी संघ विजेता; मुलींमध्ये पंचमुखी संघाने मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 08:18 PM2017-12-25T20:18:01+5:302017-12-25T20:18:18+5:30

जे.डी. पाटील सांगळूदकर स्मृती राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कामठीच्या रब्बानी फुटबॉल क्लब संघाने पटकावले. १६ वर्षांखालील गटातील ही स्पर्धा स्थानिक अभ्यासा स्पोर्ट्स अ‍ॅकेडमी व जे.डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालय स्मृती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. मुलींमध्ये पंचमुखी संघाने बाजी मारली.

Wrestler of the Kabbadi Rabbani Association at State Level Football Championship; Panchkukhi Sangh killed girls | राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत कामठीचा रब्बानी संघ विजेता; मुलींमध्ये पंचमुखी संघाने मारली बाजी

राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत कामठीचा रब्बानी संघ विजेता; मुलींमध्ये पंचमुखी संघाने मारली बाजी

googlenewsNext

अमरावती : जे.डी. पाटील सांगळूदकर स्मृती राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कामठीच्या रब्बानी फुटबॉल क्लब संघाने पटकावले. १६ वर्षांखालील गटातील ही स्पर्धा स्थानिक अभ्यासा स्पोर्ट्स अ‍ॅकेडमी व जे.डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालय स्मृती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. मुलींमध्ये पंचमुखी संघाने बाजी मारली.
अमरावती येथील एंजल अ‍ॅकेडमी व कामठीच्या रब्बानी फुटबॉल क्लब संघ यांच्यातील अंतिम सामना रंगतदार ठरला. यामध्ये १-०  आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत रब्बानी संघाने विजेतेपद गाठले. एंजल संघ हा उपविजेता ठरला. मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात अमरावतीच्या पंचमुखी फुटबॉल असोसिएशनने अभ्यासा अ‍ॅकेडमीवर ३-० ने विजय मिळविला. 
  बक्षीस वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आ. यशोमती ठाकूर होत्या. त्यांच्या  हस्ते विजेत्या संघाचा गौरव करण्यात आला. यावेळी अभ्यासा अ‍ॅकेडमीचे अध्यक्ष कुलदीप गावंडे, सचिव कुलभूषण गावंडे, प्राचार्य कांचनमाला गावंडे, सागर धनोरकर उपस्थित होते.  
तत्पूर्वी, उपांत्य फेरीचे सामने खेळले गेले. यामध्ये एंजल फुटबॉल अ‍ॅकेडमीने डीसीसी क्लब, अकोलाला ट्रायब्रेकरमध्ये ४-३ ने आकर्षक विजय मिळविला. रब्बानी फुटबॉल क्लबने अभ्यासा स्पोटर््स अ‍ॅकेडमीला अटीतटीच्या लढतीत १-० ने मात दिली. 
मुलींच्या गटात उपांत्य सामन्यातही पंचमुखी असोसिएशनने अभ्यासा स्कूलला एकतर्फी सामन्यात ५-० ने विजय मिळविला. दुसºया सामन्यात अभ्यासा फुटबॉल क्लब अ‍ॅकेडमीने एस.एफ. एस हायस्कूल (बडनेरा) वर १-० ने विजय मिळविला होता.

Web Title: Wrestler of the Kabbadi Rabbani Association at State Level Football Championship; Panchkukhi Sangh killed girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.