सुआरेझ म्हणतो ' कुणीतरी येणार यणार गं' !! 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 12:56 PM2018-07-21T12:56:21+5:302018-07-21T12:57:18+5:30

फुटबॉल विश्वचषक स्पर्धेनंतर प्रत्येक खेळाडू आपापल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. लिओनेल मेस्सी, ख्रिस्तीयानो रोनाल्डो, मोहम्मद सलाह, इडन हॅझार्ड, अँटोइने ग्रिझमन, विलियम या कुटुंबासोबत भटकंती करायला गेलेल्या खेळाडूंच्या यादीत आणखी एक नाव समाविष्ट झाले आहे.

Suarez says, 'Someone will come!' | सुआरेझ म्हणतो ' कुणीतरी येणार यणार गं' !! 

सुआरेझ म्हणतो ' कुणीतरी येणार यणार गं' !! 

ठळक मुद्देउरूग्वेचा सुपरस्टार लुईस सुआरेझने ट्विटरवर ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

बार्सिलोना  - फुटबॉल विश्वचषक स्पर्धेनंतर प्रत्येक खेळाडू आपापल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. लिओनेल मेस्सी, ख्रिस्तीयानो रोनाल्डो, मोहम्मद सलाह, इडन हॅझार्ड, अँटोइने ग्रिझमन, विलियम या कुटुंबासोबत भटकंती करायला गेलेल्या खेळाडूंच्या यादीत आणखी एक नाव समाविष्ट झाले आहे. पण हा खेळाडू चर्चेत आलाय तो एका आनंदाच्या बातमीने. उरूग्वेचा सुपरस्टार लुईस सुआरेझने ट्विटरवर ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 
रशियात नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेत उरूग्वेच्या संघाला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला  होता. दोन विश्वविजेतेपद नावावर असलेल्या या संघाच्या इथवरच्या वाटचालीत सुआरेझचा महत्त्वाचा वाटा होता. उपांत्यपूर्व फेरीतील लढतीत प्रमुख आक्रमणपटू एडिसन कव्हानीच्या अनुपस्थितीत सुआरेझने संघाची धुरा समर्थपणे पेलली, परंतु तो पराभव टाळू शकला नाही. त्यामुळे त्याचे चाहते निराश झाले. 
निराश झालेल्या चाहत्यांसाठी सुआरेझने आनंदवार्ता सांगितली आहे. सुआरेझच्या घरात एक नवा सदस्य येणार आहे. पत्नी सोफिया बाल्बी हीच्या पोटावर चुंबन घेणारा फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या गोड बातमीने त्याचे चाहते नक्की सुखावले असतील. सुआरेझ दांपत्याचे हे तिसरे बाळ आहे. हे दांपत्य आपल्या दोन मुलांसह पिकनिकला गेले आहे. सुआरेझने पोस्ट केलेल्या दुसऱ्या फोटोत तो मुलगी डेल्फिना आणि मुलगा बेंजामिन यांच्यासोबत समुद्रात पोज देऊन उभा आहे.



 

Web Title: Suarez says, 'Someone will come!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.