महाराष्ट्राच्या चार मुली भारतीय फुटबॉल संघात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 11:22 AM2018-08-02T11:22:06+5:302018-08-02T11:22:36+5:30

महाराष्ट्राच्या चार मुली सॅफ 15 वर्षांखालील मुलींच्या अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

Four girls from Maharashtra are in the Indian football team | महाराष्ट्राच्या चार मुली भारतीय फुटबॉल संघात

महाराष्ट्राच्या चार मुली भारतीय फुटबॉल संघात

मुंबई - महाराष्ट्राच्या चार मुली सॅफ 15 वर्षांखालील मुलींच्या अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. भुटान येथे 8 ते 19 ऑगस्ट या कालावधीत पार पडणा-या सॅफ स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. महाराष्ट्राच्या प्रियांका सुजीश, जान्हवी शेट्टी व मेहक लोबो ( सर्व मुंबई) आणि अंजली बारके ( पुणे) यांनी 23 सदस्यीय भारतीय संघात स्थान पटकावले आहे.

संघातील चार आक्रमकपटूंमध्ये महेकचा समावेश आहे. प्रियांकाला डिफेन्सीव मिडफिल्डर, जान्हवीला राईट विंग किंवा सेंट्रल डिफेन्सीव्ह मिडफिल्डर आणि अंजलीला गोलरक्षक म्हणून खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत भारताचा 'A' गटात समावेश करण्यात आला असून त्यांच्यासमोर श्रीलंका व यजमान भुटानचे आव्हान असणार आहे.  'B' गटात बांगलादेश, नेपाळ आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे. 



आमचा संघ समतोल आहे आणि हे खेळाडू सातत्याने प्रगती करत आहेत. सॅफ स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक संघाने मागील दोन वर्षांत बरीच प्रगती केलेली आहे. विशेष करून बांगलादेशने. मागील वर्षी त्यांनी आशिया अजिंक्यपद स्पर्धेची पात्रता मिळवली होती. त्यामुळे सॅफ स्पर्धेत आम्हाला खडतर आव्हानाला सामोरो जावे लागणार आहे, असे मत भारतीय संघाचे प्रशिक्षक फर्मिन डी,सुजा यांनी व्यक्त केले.   
भारतीय संघ
गोलरक्षक - तनू, मनिषा, अंजली बारके
बचाव - रितू देवी, नौरेम देवी, संगिता दास, कविता, सरिता सोरेंग, आर्या श्री, ज्योती कुमारी
मध्यरक्षक - प्रियांका सुजीश, जान्हवी शेट्टी, अविका सिंग, पूनम, किरण, निशा, क्रितिना देवी, वर्षा, लिंडा कोम
आक्रमण -  अंजु, मेहक लोबो, सुनिता मुंडा, एच. शिल्की देवी. 

Web Title: Four girls from Maharashtra are in the Indian football team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.