FIFA Football World Cup 2018 : सहा - सातचा खेळ; 'बिग बी'सह सोशल मीडियात चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 06:30 AM2018-07-06T06:30:00+5:302018-07-06T06:30:00+5:30

फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीचा थरार शुक्रवार आणि शनिवारी अनुभवायला मिळणार आहे. ब्राझील आणि उरूग्वे हे दक्षिण अमेरिकेतील माजी विजेत्या युरोपियन संघांची मक्तेदारी मोडून पुन्हा जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज आहेत. मात्र या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांवरून सोशल मीडियावर आतापासूनच सहा-सातचा खेळ रंगलेला पाहायला मिळत आहे आणि त्यात चक्क बिग बी अमिताभ बच्चन यांनीही सहभाग घेतला.

FIFA Football World Cup 2018: Six-Seven Games; Social media coverage with Big B was discussed | FIFA Football World Cup 2018 : सहा - सातचा खेळ; 'बिग बी'सह सोशल मीडियात चर्चेला उधाण

FIFA Football World Cup 2018 : सहा - सातचा खेळ; 'बिग बी'सह सोशल मीडियात चर्चेला उधाण

googlenewsNext
ठळक मुद्देबच्चन यांच्या या ट्विटला जवळपास हजार जणांनी रिट्विट केले, तर पाच हजाराहून अधिक लाईक्स मिळाल्या. 

मॉस्को - फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीचा थरार शुक्रवार आणि शनिवारी अनुभवायला मिळणार आहे. ब्राझील आणि उरूग्वे हे दक्षिण अमेरिकेतील माजी विजेत्या युरोपियन संघांची मक्तेदारी मोडून पुन्हा जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज आहेत. मात्र या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांवरून सोशल मीडियावर आतापासूनच सहा-सातचा खेळ रंगलेला पाहायला मिळत आहे आणि त्यात चक्क बिग बी अमिताभ बच्चन यांनीही सहभाग घेतला.  त्यांनीही उपांत्यपूर्व फेरीचे अमेझिंग फॅक्ट्स ट्विटरवर शेअर केले आहे.  बच्चन यांच्या या ट्विटला जवळपास हजार जणांनी रिट्विट केले, तर पाच हजाराहून अधिक लाईक्स मिळाल्या. 



फ्रान्स आणि उरूग्वे यांच्या लढतीने शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीच्या लढतींना प्रारंभ होणार आहे, तर याच दिवशी ब्राझील विरूद्ध बेल्जियम ही लढत होईल. शनिवारी स्वीडन विरूद्ध इंग्लंड आणि रशिया विरूद्ध क्रोएशिया असे सामने होणार आहेत. या सामन्यांच्या तारखा आणि संघांच्या इंग्लिश नावांची जुळवाजुळव करून सोशल मीडियावर सहा-सातचा खेळ सुरू आहे. 





Web Title: FIFA Football World Cup 2018: Six-Seven Games; Social media coverage with Big B was discussed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.