FIFA Football World Cup 2018 : बेल्जियमपुढे जपानचे कडवे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 02:54 AM2018-07-02T02:54:52+5:302018-07-02T02:55:18+5:30

फिफा विश्वकप स्पर्धेत बेल्जियम संघाला सोमवारी उपउपांत्यपूर्व फेरीत जपानच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. ड्राइस मर्टेन्सने आपल्या संघाला जपानला कमी लेखण्याची चूक न करण्याचा सल्ला दिला आहे.

FIFA Football World Cup 2018: Belgium's bitter challenge ahead of Belgium | FIFA Football World Cup 2018 : बेल्जियमपुढे जपानचे कडवे आव्हान

FIFA Football World Cup 2018 : बेल्जियमपुढे जपानचे कडवे आव्हान

Next

रोस्तोव-आॅन-दोन : फिफा विश्वकप स्पर्धेत बेल्जियम संघाला सोमवारी उपउपांत्यपूर्व फेरीत जपानच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. ड्राइस मर्टेन्सने आपल्या संघाला जपानला कमी लेखण्याची चूक न करण्याचा सल्ला दिला आहे.
बेल्जियम संघ विश्वकप स्पर्धेत ‘छुपा रुस्तम’ ठरला असून हा संघ बाद फेरीत आगेकूच करण्यात यशस्वी ठरेल, अशी आशा आहे. त्यांनी अखेरच्या साखळी लढतीत इंग्लंडचा १-० ने पराभव करीत ‘जी’ गटात अव्वल स्थान पटकावले. बेल्जियमला अंतिम १६ च्या लढतीत जपानच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. दरम्यान, मर्टेन्सने संघाला २०१६ च्या युरो स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीची पुनरावृत्ती टाळण्याचा सल्ला दिला आहे. त्यावेळी बेल्जियम संघ प्रबळ दावेदार असताना वेल्सविरुद्ध १-३ ने पराभूत झाला होता.
मर्टेन्स म्हणाला, ‘आम्ही जपानला कमी लेखण्याची चूक करणार नाही. कारण त्यांचा संघ मजबूत आहे. जर त्यांनी साखळी फेरीचा अडथळा पार केला आहे म्हणजे त्यांचा संघ नक्कीच तुल्यबळ आहे.’
आतापर्यंत नऊ गोल नोंदविणारा बेल्जियम संघ स्पर्धेत सर्वाधिक गोल नोंदविणारा संघ आहे. स्ट्रायकर रोमेलू लुकाकूने साखळी फेरीत ट्युनिशिया व पनाविरुद्ध प्रत्येकी दोन गोल नोंदवले आहेत. टाचेच्या दुखापतीमुळे गेल्या लढतीत खेळू न शकलेला लुकाकू जपानच्या आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज आहे.
मार्टिनेजचे सर्व खेळाडू फिट असून बेल्जियम संघ आपल्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीमध्ये सुधारणा करण्यात यशस्वी ठरेल, अशी आशा आहे. संघाने ३२ वर्षांपूर्वी मॅक्सिकोमध्ये १९८६ मध्ये झालेल्या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती.
जपान प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठत इतिहास नोंदविण्यास प्रयत्नशील आहे. जपानने यापूर्वी २००२ व २०१० मध्ये उपउपांत्यपूर्व फेरी गाठली होती, पण दोन्हीवेळा त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. जपानला अखेरच्या साखळी लढतीत पोलंडविरुद्ध ०-१ ने पराभव स्वीकारावा लागला होता, पण सेनेगलच्या तुलनेत पिवळे कार्ड कमी मिळल्याने त्यांना बाद फेरीत प्रवेश करता आला. (वृत्तसंस्था)

Web Title: FIFA Football World Cup 2018: Belgium's bitter challenge ahead of Belgium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.