...म्हणून अमिताभ म्हणाले, 'आफ्रिका फुटबॉल वर्ल्ड कप जिंकली!' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 14:57 IST2018-07-16T14:56:00+5:302018-07-16T14:57:02+5:30

याचदरम्यान फ्रान्सच्या विजयाबाबत केलेल्या ट्विटमुळे बिग बी अमिताभ बच्चन हे ट्रोल झाले आहेत.  

Amitabh Bachchan got troll due to a tweet about France's victory in fifa world cup | ...म्हणून अमिताभ म्हणाले, 'आफ्रिका फुटबॉल वर्ल्ड कप जिंकली!' 

...म्हणून अमिताभ म्हणाले, 'आफ्रिका फुटबॉल वर्ल्ड कप जिंकली!' 

मुंबई -  फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत फ्रान्सने क्रोएशियावर  4-2 अशा दणदणीत फरकाने विजय मिळवत  फुटबॉल विश्वचषकावर दुसऱ्यांदा नाव कोरले. या विजयानंतर फ्रान्सच्या जगभरातील चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. मात्र याचदरम्यान फ्रान्सच्या विजयाबाबत केलेल्या ट्विटमुळे बिग बी अमिताभ बच्चन हे ट्रोल झाले आहेत.  





हा विश्वचषक आफ्रिकेने जिंकला आहे. कारण विश्वचषक विजेत्या संघातील बहुतांश खेळाडू मुळचे आफ्रिकेतील आहेत. अशा आशयाचे ट्विट अमिताभ बच्चन यांनी केले. मात्र त्यांच्या या ट्विटवर नेटीझन्स नाराज झाले. " आफ्रिकेने 2018 च्या फिफा विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. हे वास्तव आहे. कारण विश्वविजेत्या फ्रान्सच्या संघातील बहुतांश खेळाडू मूळचे आफ्रिकेतील आहेत." असे अमिताभ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. 



 

Web Title: Amitabh Bachchan got troll due to a tweet about France's victory in fifa world cup