युरोपातील मातब्बर संघ एकमेकांना भिडणार, फुटबॉल चाहत्यांसाठी पर्वणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 03:41 PM2018-09-05T15:41:01+5:302018-09-05T15:41:25+5:30

रशियात नुकत्याच पार पडलेल्या फुटबॉल विश्वचषकाचा ज्वर कमी होण्यापूर्वी युरोपियन फुटबॉल महासंघ (युएफा) दर्दी फुटबॉल चाहत्यांसाठी 55 देशांचा सहभाग असलेल्या Nations League घेऊन आले आहेत.

55 European nations play in UEFA Nations League | युरोपातील मातब्बर संघ एकमेकांना भिडणार, फुटबॉल चाहत्यांसाठी पर्वणी

युरोपातील मातब्बर संघ एकमेकांना भिडणार, फुटबॉल चाहत्यांसाठी पर्वणी

Next

UEFA Nations League: रशियात नुकत्याच पार पडलेल्या फुटबॉल विश्वचषकाचा ज्वर कमी होण्यापूर्वी युरोपियन फुटबॉल महासंघ (युएफा) दर्दी फुटबॉल चाहत्यांसाठी 55 देशांचा सहभाग असलेल्या Nations League घेऊन आले आहेत.  मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय सामन्यांचे अर्थहीन वेळापत्रक रद्दबातल करत युएफाने ही लीग आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. युरोपातील 55 देशांचा सहभाग असलेल्या या लीगला गुरुवारपासून सुरूवात होत आहे.



या 55 संघांची चार गटांत विभागणी करण्यात आली असून प्रत्येक गटातील विजेता 2020च्या युरो स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहे. फिफाच्या क्रमवारीनुसार युरोपातील अव्वल 12 संघ अ गटात असतील, तर ब गटात 12, क गटात 15 आणि ड गटात 16 संघांचा समावेश असणार आहे. होम-अवे अशा फॉरमॅटमध्ये प्रत्येक गटाचे सामने होतील. स्पर्धेचा पहिलाच सामना फ्रान्स आणि जर्मनी या आजी-माजी विजेत्यांमध्ये होणार आहे. त्यापेक्षा या लीगची धडाक्यात सुरूवात होऊच शकत नाही. 


अ गटातील संघांची विभागणी
गट 1 - फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स
गट 2 - बेल्जियम, आईसलँड, स्वित्झर्लंड
गट 3 - इटली, पोलंड, पोर्तुगाल
गट 4 - क्रोएशिया, इंग्लंड, स्पेन


स्पर्धेचे वेळापत्रक
पहिला टप्पा - 6 ते 9 सप्टेंबर
दुसरा टप्पा - 9 ते 11 सप्टेंबर
तिसरा टप्पा - 11 ते 13 ऑक्टोबर
चौथा टप्पा - 14 ते 16 ऑक्टोबर
पाचवा टप्पा - 15 ते 17 नोव्हेबर
सहावा टप्पा - 18 ते 20 नोव्हेबर
अंतिम टप्पा - 5 ते 9 जून 2019

Web Title: 55 European nations play in UEFA Nations League

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.