या दहा युक्त्या वापरा आणि घरच्याघरी उत्तम केक तयार करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 06:56 PM2017-12-14T18:56:17+5:302017-12-14T19:03:01+5:30

ख्रिसमसनिमित्त विविध फ्लेवर्सचे केक आणि कुकीज तुम्हीही ट्राय करणार असाल तर ते परफेक्ट होण्यासाठी काही टिप्स फॉलो कराच! यामुळे हे पदार्थ बिघडणार तर नाहीच शिवाय त्यांचे रंग, टेक्शचर्स पाहून तुम्हाला स्वत:ला समाधान आणि इतरांकडून कौतुकाची पावती मिळाल्याशिवाय राहाणार नाही.

Use these ten tricks and make great cakes at home! | या दहा युक्त्या वापरा आणि घरच्याघरी उत्तम केक तयार करा!

या दहा युक्त्या वापरा आणि घरच्याघरी उत्तम केक तयार करा!

Next
ठळक मुद्दे* केक डेकोरेट करण्यासाठी वापरत असलेले क्रीम, आयसिंग हे सिरिंज पाईपमध्ये भरूनच वापरा. यामुळे इफेक्ट छान मिळेल.* केक नरम तसेच रवाळ होण्यासाठी केकच्या मिश्रणात ताजं ताक वापरा. ताकात एक चमचा लिंबाचा रस घातल्यास केकला छान सुगंध देखील येईल.* ख्रिसमससाठी केक करतानाही तुम्हाला पर्सनल टच देता येतो. साखरेऐवजी ब्राऊन शुगर, मैद्याऐवजी गव्हाचे पीठ, नाचणीचे पीठ , अंड्याऐवजी दही, केळी असे पौष्टिक पर्याय तुम्ही वापरु शकता.

- सारिका पूरकर-गुजराथी


ख्रिसमस अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. ख्रिसमस म्हटलं की केक खायचे वेध लागतातच. अनेक घरात खास ख्रिसमसनिमित्त आवडीनं केक तयार केला जातो. मऊ, स्पंजसारखा लुसलुशीत, त्यावर क्रीमनं केलेली सुंदर सजावट आणि त्यावर लावलेल्या सुंदर कॅण्डल्स. ख्रिसमस सेलिब्रेशन म्हणतात ते हेच ते. तर ख्रिसमसनिमित्त विविध फ्लेवर्सचे केक आणि कुकीज तुम्हीही ट्राय करणार असाल तर ते परफेक्ट होण्यासाठी काही टिप्स फॉलो कराच! यामुळे हे पदार्थ बिघडणार तर नाहीच शिवाय त्यांचे रंग, टेक्शचर्स पाहून तुम्हाला स्वत:ला समाधान आणि इतरांकडून कौतुकाची पावती मिळाल्याशिवाय राहाणार नाही.

 


 

केक बेक करताना..

1) केक बेक करु न ओवनमधून बाहेर काढल्यानंतर त्याला पूर्ण थंंड करु नका. तो थोडासा कोमट असतानाच भांड्यातून डीमोल्ड करा. म्हणजेच प्लेटवर काढून घ्या. यामुळे केकचे टेक्शचर मेन्टेन राहते.

2) केक डेकोरेट करण्यासाठी वापरत असलेले क्रीम, आयसिंग हे सिरिंज पाईपमध्ये भरूनच वापरा. यामुळे इफेक्ट छान मिळेल. बाजारात विविध नोझल्स असलेले सिरिंज मिळतात. त्याचा वापर कल्पकतेनं केल्यास तुमचा केक आणखी सुंदर दिसेल.

3) केक नरम तसेच रवाळ होण्यासाठी केकच्या मिश्रणात ताजं ताक वापरा. ताकात एक चमचा लिंबाचा रस घातल्यास केकला छान सुगंध देखील येईल. बरेचदा केकचे बॅटर सैल करण्यासाठी दूध वापरलं जातं. त्याऐवजी ताक वापरल्यास केक कडक होणार नाही.

4) केकच्या मिश्रणात नेहमी चवीला मीठ घालायला विसरु नका. मीठामुळे केकच्या बॅटरमध्ये गुठळ्या होत नाहीत. जर गुठळ्या झाल्या नाहीत तरच तुमचा केक मऊ होतो. त्यामुळे केकसाठीही मीठ सर्वात उपयुक्त घटक पदार्थ आहे. प्रमाणात घालायला हवं हे मात्र नक्की.

 

 

5) बीटरूटची प्युरी केकमध्ये घालून केकला छान लालसर चॉकलेटी रंग देता येईल. तसेच बीटरु टमुळे केकला आपोआपच चॉकलेट फ्लेवरही मिळतो. शिवाय केकची पौष्टिकताही वाढते. एरवी मुलं कच्चं बीटरु ट खात नाहीत. केकमुळे मात्र ते नक्की बीटरु ट खाऊ लागतील.

6) कुकीज, बिस्किटं तयार करताना बटर हे मऊ हवं. तसेच चांगलं फेसलेलं हवं तरच कुकीज मऊ होतात.

7) कुकीज डेकोरेट करण्यासाठी चॉकलेट सॉसचे स्ट्रोक्स ट्राय करा. तसेच अर्धी कुकी चॉकलेट सॉसमध्ये बुडवून देखील टू कलर इफेक्ट देता येतो. पीठीसाखर, दूध, बटर एकत्र करून या मिश्रणाचा थर कुकीजवर देऊन सेट करा. त्यावर मग आईसिंग पाईपिंगच्या सहाय्यानं कार्टून्स, आकर्षक फुलं-पानं यांच्या डिझाईन्स कुकीजवर काढा. साखर-बटर मिश्रणाचे स्ट्रोक्सही कुकीजवर छान दिसतात.

8) ख्रिसमससाठी केक करतानाही तुम्हाला पर्सनल टच देता येतो. साखरेऐवजी ब्राऊन शुगर, मैद्याऐवजी गव्हाचे पीठ, नाचणीचे पीठ , अंड्याऐवजी दही, केळी असे पौष्टिक पर्याय तुम्ही वापरु शकता.ख्रिसमस केक सहसा भरपूर फळे आणि सुकामेवा घालून बनवला जातो. त्यामुळे संत्री, स्ट्रॉबेरी यांसारख्या फळांचा वापर केकसाठी करता येतो.

9) प्लेन व्हॅनिला, चॉकलेट केक देखील ख्रिसमस केक म्हणून सर्व्ह करता येईल. मात्र त्याऐवजी या ख्रिसमसला काहीतरी हटके करायचा विचार करीत असाल तर पेठा, संत्र्याचा स्क्वॅॅश, बडीशेप, सुकेमेवे वापरु न केलेला अस्सल भारतीय चवीचा अलाहाबादी केक , जर्मन फ्रूट केक स्टोलेन, फ्रान्सचा बुचे डे नोएल केक, स्कॉटलंडचा भरपूर बदाम घातलेला डुंडी केक , पारंपरिक चवीचा प्लम केक, चॉकलेट प्रेमींचा लाडका मड केक,  क्रंची चव देणारा कॉफी आणि अक्रोडचा मारा असलेला वॉलनट केक या चवी ट्राय करायला हरकत नाही.

10) याव्यतिरिक्त छान छोटे छोटे कप केक्स, फ्रूट केकमध्ये आवडीनुसार फळांची अदलाबदल करु न केलेले केक, पम्पकिन केक, डेट अ‍ॅण्ड नट केक, लोफ केक, रम केक, जायफळ, दालचिनी, संत्री आणि भरपूर अंजीर घातलेला फिग पुडिंग केक, इटालियन  क्रीम केक, गाजराचा केक, व्हाईट चॉकलेट रासबेरी चीजकेक या अत्यंत वेगळ्या चवी यंदाच्या ख्रिसमसला ट्राय करायलाच्या हव्यात.

 

 

 

Web Title: Use these ten tricks and make great cakes at home!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.