शिंगाड्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत नसतील

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 04:28 PM2018-12-27T16:28:02+5:302018-12-27T16:31:01+5:30

थंडीमध्ये बाजारामध्ये शिंगाड्यांची मुबलक प्रमाणात आवाक होते. तुम्ही हे कच्चे, उकळून किंवा हलवा तयार करून खाऊ शकता. तसं पाहायला गेलं तर शिंगाडा ही एक पाण्यातील भाजी असून तिला वॉटर चेस्‍टनट (Water Chestnut) असंही म्हटलं जातं.

Singhara health benefits in Marathi do you know about these benefits of singhara | शिंगाड्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत नसतील

शिंगाड्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत नसतील

googlenewsNext

थंडीमध्ये बाजारामध्ये शिंगाड्यांची मुबलक प्रमाणात आवाक होते. तुम्ही हे कच्चे, उकळून किंवा हलवा तयार करून खाऊ शकता. तसं पाहायला गेलं तर शिंगाडा ही एक पाण्यातील भाजी असून तिला वॉटर चेस्‍टनट (Water Chestnut) असंही म्हटलं जातं. शिंगाड्यामध्ये मानवासाठी अनेक आरोग्यवर्धक गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे शरीराचं अनेक आजारांपासून बचाव करणं सोपं जातं. 

शिंगाडे खाण्याचे फायदे :

- डोळ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी अवश्य शिंगाड्यांचं सेवन करा. यामध्ये व्हिटॅमिन बी 6 मुबलक प्रमाणात असतं. जर शिंगाड्यांचा आहारात समावेश केला तर ते शरीरासाठी आरोग्यदायी ठरतं. शरीराला आवश्यक असणारं व्हिटॅमिन बी 6 डोळ्यांच्या समस्यांसोबतच वयाशी निगडीत मॅक्युलर अपघटन (Macular Degeneration) करण्याची सुरुवात कमी करण्यासाठी मदत करतात. 

- अस्थमाच्या रूग्णांसाठी शिंगाडा फायदेशीर असतो. शिंगाड्यांचा नियमितपणे आहारात समावेश केल्याने श्वसनासंबधीचे सर्व आजार दूर होतात. 

- शिंगाडा डिप्रेशनसारख्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतो. 

- शिंगाड्याचे सेवन केल्याने भेगाळलेल्या टाचा ठिक होतात. याव्यतिरिक्त शरीरामध्ये कुठेही वेदना किंवा सूज आली असेल तर याचा लेप लावल्याने फायदा होतो. 

- शिंगाड्यामध्ये कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे शिंगाड्याचं सेवन केल्यामुळे हाडं आणि दात मजबूत होतात. त्याचबरोबर डोळ्यांसाठीही फायदेशीर ठरतं. 

- गरोदरपणात शिंगाडा खाल्याने आई आणि बाळाचं आरोग्य चांगलं राहतं. त्यामुळे गर्भपाताचा धोकाही कमी होतो. याव्यतिरिक्त शिंगाडा खाल्याने मासिक पाळीमध्ये उद्भवणाऱ्या समस्यांही दूर होतात. 

- शिंगाड्याचं सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरत दूर होते. त्याचबरोबर पोटाच्या समस्यांवरही फायदेशीर ठरतं. 

- शिंगाडा शरीराला ऊर्जा देण्यासाठी मदत करतो. त्यामुळे उपवासाच्या दिवशी शिंगाड्याचं सेवन करावं. 

- हृदयविकाराच्या आजारांनी ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींना शिंगाड्याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. तसेच रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठीही यातील पोषक घटक मदत करतात. 

Web Title: Singhara health benefits in Marathi do you know about these benefits of singhara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.