उन्हाळ्यामध्ये अ‍ॅसिडीटी दूर करण्यासाठी 'हे' ड्रिंक करेल मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 06:35 PM2019-04-09T18:35:47+5:302019-04-09T18:40:23+5:30

उन्हाळ्यामध्ये अनेकदा अ‍ॅसिडिटीसारख्या आजारांचा सामना करावा लागतो. अशातच अनेकदा खाणं कमी करावं लागतं. नाहीतर ब्लोटिंग म्हणजेच, पोट फुगण्याची समस्या होते.

Drink thandai for acidity and bloating in summer | उन्हाळ्यामध्ये अ‍ॅसिडीटी दूर करण्यासाठी 'हे' ड्रिंक करेल मदत

उन्हाळ्यामध्ये अ‍ॅसिडीटी दूर करण्यासाठी 'हे' ड्रिंक करेल मदत

Next

(Image Credit : eastern.in)

उन्हाळ्यामध्ये अनेकदा अ‍ॅसिडिटीसारख्या आजारांचा सामना करावा लागतो. अशातच अनेकदा खाणं कमी करावं लागतं. नाहीतर ब्लोटिंग म्हणजेच, पोट फुगण्याची समस्या होते. यामुळे अगदी नकोसं होतं. जळजळ आणि वेदनांमुळे काम करणं अवघड होऊन जातं. या समस्येपासून सुटका करण्यासाठी तुम्ही एक खास ड्रिंक ट्राय करू शकता. 

खास गोष्ट म्हणजे, ही ड्रिंक आपल्याला अ‍ॅसिडिटी आणि ब्लोटिंगपासून सुटका करण्यासोबतच शरीराला थंडावाही देते आणि जीभेवर स्वादिष्ट चवही राहते. 

सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने इंस्टाग्रामवर केलेल्या एका पोस्टमध्ये, उन्हाळ्यामध्ये थंडाई शरीरासाठी अत्यंत फायदेशीर समजली जाते. यामध्ये थंड दूध, बदाम, खसखस, वेलची, केशर, नट्स आणि बडिशोप यांसारखे पदार्थ असतात. हे सर्व पदार्थ शरीराला थंडावा देण्यासाठी मदत करतात. 

या कॉम्बिनेशनमुळे शरीराला थंडावा मिळण्यासोबतच एनर्जीही मिळते. तसेच उन्हामुळे होणाऱ्या पोटाच्या समस्याही दूर होतात. अ‍ॅसिडिटीसोबतच गॅसच्या समस्या दूर करण्यासाठीही फायदेशीर ठरते. 

एवढचं नाही तर हार्मोन्स बॅलेन्स करण्यासाठीही मदत होते. यामध्ये असलेल्या अ‍ॅन्टीऑक्सिडंट प्रॉपर्टिज त्वचेसोबतच शरीरासाठीही अत्यंत फायदेशीर ठरतात. पचनक्रिया सुधारण्यासोबतच गट-फ्रेंडली बॅक्टरिया रिस्टोर करतं, ज्यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात. 

साहित्य :

  • साखर - 5 कप 
  • पाणी - 2 1/2 कप 
  • बदाम - 1/2 कप 
  • बडिशोप - 1/2 कप 
  • काळी मिरी - 2 छोटे चमचे
  • खसखस - 2 छोटे चमचे
  • छोटी वेलची - 30 ते 35 
  • गुलाब पाणी - 2 टेबलस्पून
     

कृती :

- एखाद्या भांड्यामध्ये साखर आणि पाणी एकत्र करून गॅसवर उकळण्यासाठी ठेवा. 

- एक उकळी आल्यानंतर 5 ते 6 मिनिटांपर्यंत उकळत ठेवा. त्यानंतर गॅस बंद करून ठंड होण्यासाठी ठेवा.

- बडिशोप, काळी मिरी, बदाम, वेलचीचे दाणे आणि खसखस साफ करा आणि धुवून पाण्यामध्ये 2 तासांसाठी भिजत ठेवा. 

- त्यानंतर बदामाची सालीसोबतच मिश्रणाती एक्स्ट्रा पाणी बारिक पेस्ट तयार करा. 

- पेस्ट तयार करताना पाण्याऐवजी साखरेच्या पाण्याचा वापर करा. 

- त्यानंतर गाळणीच्या सहाय्याने गाळून त्यामध्ये ड्रायफ्रुट्स एकत्र करू शकता. 

- थंडगार थंडाई तयार आहे. हे मिश्रण एयरटाइट बाटलीमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवा. 

- जेव्हाही थंडाई पिण्याची इच्छा होईल, त्यावेळी हे मिश्रण दूध आणि बर्फासोबत एकत्र करा.

- आस्वाद घ्या थंडगार थंडाईचा.

Web Title: Drink thandai for acidity and bloating in summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.