'या' आहेत जगातल्या सर्वात सुंदर महिला शेफ, यांच्या अदांचे आहेत लाखो चाहते!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 03:10 PM2018-09-28T15:10:36+5:302018-09-28T15:13:21+5:30

महिला स्वयंपाक चांगला करत असतील तर त्यांचं कौतुक करण्यासाठी कोणत्याही मेकअपची गरज पडत नाही. लोकं बोटं चाटून चाटून कौतुकाच्या माळा विणतात.

10 beautiful female chef all over the world | 'या' आहेत जगातल्या सर्वात सुंदर महिला शेफ, यांच्या अदांचे आहेत लाखो चाहते!

'या' आहेत जगातल्या सर्वात सुंदर महिला शेफ, यांच्या अदांचे आहेत लाखो चाहते!

Next

(Image Credit : www.firkee.in)

महिला स्वयंपाक चांगला करत असतील तर त्यांचं कौतुक करण्यासाठी कोणत्याही मेकअपची गरज पडत नाही. लोकं बोटं चाटून चाटून कौतुकाच्या माळा विणतात. आणि ती चांगली जेवण तयार करत असेल आणि तितकीच सुंदर असेल तर तिच्या चाहत्यांची यादी भलीमोठी असू शकते. आज आम्ही तुम्हाला जगातल्या त्या सुंदर शेफबाबात सांगणार आहोत ज्यांच्या केवळ अदांचेच नाही तर त्यांच्या पदार्थांचेही चाहते आहे. 

१०) पद्मलक्ष्मी

भारतीय वंशाची पद्मलक्ष्मीने आपल्या देशी साऊथ इंडियन रेसिपीजने अमेरिका आणि यरोपमध्ये धमाका केला आहे. पद्मलक्ष्मी ही रेसिपीची पुस्तकेही लिहिते. सोबतच ती एक मॉडेल आहे, टीव्ही होस्ट आहे आणि निर्मातीही आहे. पद्मलक्ष्मीला १९९९ मध्ये तिच्या 'इझी एक्झोटिक' या रेसिपीच्या पुस्तकासाठी बेस्ट फर्स्ट बुकचा पुरस्कारही मिळाला आहे. तर ती २०१० मध्ये रिअॅलिटी शो टॉप शेफमध्ये अॅंकरिंगही केलं होतं. यासाठीही तिला पुरस्कार मिळाला होता.

९) रॅचेल रे

न्यूयॉर्कची रॅचेल रे कुकिंगच्या विश्वातील चांगलंच लोकप्रिय नाव आहे. रेसिपीज तिने अनेक पुस्तके लिहिली आहेत. तसेच ती एक यशस्वी उद्योजिकाही आहे. टीव्हीवर येणाऱ्या डेली टॉक शोसाठी तिने एम्मी पुरस्कारही मिळवला आहे. 

८) नाडिया जियोसिया

पदार्थ तयार करण्याच्या गुपिताला कॉमेडीच्या माध्यमातून सादर करणारी नाडिया आपल्या खास शैलीसाठी प्रसिद्ध आहे. नाडिया ही कॅनडाची आहे. अनेक टीव्ही शो आणि रेसिपी कार्यक्रमामध्ये ती दिसली आहे. आपल्या अदांनी नाडियाने चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. 

७) एनी फायो

कॅनडाची एनी फायो ही रॉ फूडिज्म लाइफस्टाइलसाठी ओळखली जाते. १९९९ मध्ये तिने स्मार्कमंकी फूड कंपनीची सुरुवात केली. २००९ मध्ये तिने कंपनी विकली. त्यानंतर फायोने इंटरनेटच्या विश्वात वेबसाईट ओनर म्हणून काम सुरु केले. पुस्तके लिहिली. 

६) कॅथरीन मॅककॉर्ड

इंटरनॅशनल मॅगझिन ग्लॅमर आणि एलीच्या कव्हर पेजवर केवळ १४ वय असताना कॅथरीन मॅककॉर्डचा फोटो छापला गेला होता. पण तिला शेफ व्हायचे होते म्हणून तिने मॉडलिंगच्या क्षेत्रापासून स्वत:ला दूर केलं. २००१ मध्ये कॅथरीनला जगातल्या सर्वात आकर्षक महिलांमध्ये सामिल करण्यात आलं होतं. आता ती रेसिपीवर आधारित weelicious.com ही वेबसाईट चालवते.

५) गियाडा डे लॉरेंटिस

इटलीच्या गियाडाचाही रेसिपीची पुस्तके आणि टीव्ही शोचा संबंध आहे. फूड नेटवर्कचा गियाडा अॅट होम हा तिचा शो चांगलाच लोकप्रिय आहे.

४) लांसू चेन

लांसू चेन ही एक तायवानी शेफ आहे. फूडिंगमधील आवडीमुळे ती पॅरीसला गेली होती. तिथेच तिने शेफ म्हणून करिअर सुरु केलं. पॅरीसमध्ये चेनने पाककलेचं शिक्षण घेतलं. आज ती एक यशस्वी शेफ आहे. 

३) रेचेल बिलो

रेटेल बिलो ने न्यूयॉर्कच्या अल्डिया स्थित मेडिटेरियन रेस्टॉरंटमधून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. रेचेल 'यूएस टुडे', 'न्यूयॉर्क कॉर्क रिपोर्ट' आणि 'एडीबल फिंगर लेक्स' सारख्या मॅगझिनमध्ये लेखिका आहे. तिने रेसिपीचीही काही पुस्तके लिहीली आहेत. तिचं  'द कॉल ऑफ द फार्म' हे सर्वात गाजलेलं पुस्तक आहे. 

२) डेविन अलेक्झांडर

डेविन अलेक्झांडरने शेफ म्हणून करिअऱला सुरुवात वेस्टलेक कलिनरी इन्स्टीट्यूटच्या बाहेर आपल्या 'कॅफे रेनी'ने केली होती. त्यानंतर 'द बिगेस्ट लूजर' हे रेसिपी पुस्तक लिहीलं. तिच्या रेसिपींनी टीव्हीवर धमाका केला होता. तसेच तिने २००७ मध्ये डिस्कवरी हेल्थ आणि फिट टीव्हीवर एका प्रोग्रॅमही होस्ट केलाय.

१) डायलन लॉरेन

पाच वर्षांची असताना डायलन लॉरेनने 'विली वोंका अॅन्ड चॉकलेट फॅक्टरी' या हॉलिवूड सिनेमात काम केलं होतं. सिनेमाचा प्रभाव लॉरेनवर झाला. आज ती जगातल्या सर्वात मोठ्या कॅंडी स्टोरची मालकीन आहे. स्टोरमध्ये ७ हजार कॅंडीच्या व्हेरायटीज आहेत. लॉरेन प्रसिद्ध क्लॉथ डिझायनर राफ लॉरेनची मुलगी आहे. 
 

Web Title: 10 beautiful female chef all over the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.