पदार्थ महाराष्ट्रीयन असो किंवा बंगाली या 9 प्रकारच्या फोडण्यांनी पदार्थ होतात झक्कास.. चवदार.. या फोडण्या ट्राय करून बघा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 06:37 PM2017-07-19T18:37:54+5:302017-07-19T18:37:54+5:30

फोडणीचे भारतीय पाककलेत अनेक प्रकार पाहायला मिळतात.कोणत्या पदार्थाला कोणती फोडणी आणि कशी द्यायची हे समीकरण जमायला हवं.

The substance of Maharashtrian or Bengal is made of 9 types of sesame seeds. Tasty .... Try this blistering tray! | पदार्थ महाराष्ट्रीयन असो किंवा बंगाली या 9 प्रकारच्या फोडण्यांनी पदार्थ होतात झक्कास.. चवदार.. या फोडण्या ट्राय करून बघा!

पदार्थ महाराष्ट्रीयन असो किंवा बंगाली या 9 प्रकारच्या फोडण्यांनी पदार्थ होतात झक्कास.. चवदार.. या फोडण्या ट्राय करून बघा!

googlenewsNext



-सारिका पूरकर-गुजराथी.

फोडणी. भारतीय पाककलेचा कणाच म्हणायला हवं फोडणीला. कोणत्याही भाजीची, वरणाची, भात, खिचडी एवढेच काय तर ढोकळा, सुरळीची वडी या पदार्थांचीही चव या फोडणीवर अवलंबून असते. म्हणूनच तर स्वयंपाकघरात भाजीला फोडणी दिल्यावर त्याचा वास घरभर दरवळला तर लगेच ‘फोडणी चांगली बसली’ असं म्हटलं जातं. या फोडणीच्या चवीवरूनच पदार्थ चविष्ट होणार की बेचव याचे आडाखे बांधले जातात. थोडक्यात काय तर या फोडणीवर बऱ्याच पदार्थांचं भविष्य अवलंबून असतं. तर अशा या फोडणीचे भारतीय पाककलेत अनेक प्रकार पाहायला मिळतात. प्रक्रिया जरी एक असली तरी त्यातील घटक पदार्थ खूप वेगवेगळे वापरले जातात. म्हणूनच कोणत्या पदार्थाला कोणती फोडणी आणि कशी द्यायची हे समीकरण जमायला हवं.

कोणती फोडणी कोणाला?

1) तूप-जिरे
उपवासाच्या पदार्थांसाठी ही फोडणी दिली जाते. शक्यतो या फोडणीसाठी साजूक तुपाचाच वापर या फोडणीसाठी करावा. साजूक तुपाची फोडणी देताना गॅसची आच मंद असावी. कारण हे तूप चटकन जळतं. म्हणून या फोडणीसाठी जाड बुडाचं भांडं वापरावं. तूप कोमट झालं की लगेच जिरे घालावे. जिरेही मध्यम आचेवर तडतडू द्यावेत अन्यथा तेही जळतात. तूप आणि जिरे मंद आचेवर तापवूनच ही फोडणी द्यावी. उपवासाच्या सर्व पदार्थांना ही फोडणी दिली जाते. हिरव्या मिरच्या, आले याचाही वापर यासाठी केला जातो. साबुदाणा खिचडी, उपवासाची भाजी यासाठी ही फोडणी वापरतात. साबुदाण्याच्या खिचडीची फोडणी करताना लाल तिखट वापरत असाल तर ते कधीही तुपात घालू नका. साबुदाण्याला लावून घ्या. यामुळे तिखट जळणार नाही आणि खिचडीलाही छान रंग येइल.

 

Web Title: The substance of Maharashtrian or Bengal is made of 9 types of sesame seeds. Tasty .... Try this blistering tray!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.