- मोहिनी घारपुरे-देशमुख

ॠतूप्रमाणे आपला वॉर्डरोब अप टू डेट ठेवण्यात फक्त मुलींना आणि महिलांनाच रस असतो असं नाही. मुलांना आणि पुरूषांनाही हे आवडतं.पावसाळ्यात आपल्या वॉर्डरोबमध्ये नवीन काही असण्याची खाज पुरूषांनाही असते. आता यासाठी हवाईअन शर्ट हा एक उत्तम पर्याय आहे. या हिरव्या ॠतूूत घराबाहेर पडताना तरूणी आणि महिलांसाठी ज्याप्रमाणे बॉटनिकल ड्रेसेसचा पर्याय आहे त्याप्रमाणेच या रंगीबेरंगी हवाईन शर्ट्सचा पर्याय पुरूषांसाठीही आहे.
शॉर्ट स्लीव्हस, लूझ फिटींग आणि ओपन कॉलर ही या हवाईयन शर्टची खासियत आहे. हे अशा प्रकारचे शर्ट्स विशेषत्त्वानं हवाईतील पुरूष परिधान करतात, त्यावरूनच या शर्ट्सला हवाईअन शर्ट असं नाव देण्यात आलं आहे. याच शर्ट्सला ‘अलोहा शर्ट ’असंही म्हणतात.
या शर्ट्सचे कापड तलम, झुळझुळीत, रंगीबिरंगी प्रिंटेड अशा पद्धतीचं असतं. तसेच या कपड्यावर फुलं, पानं, पक्षी, समुद्र वगैरेंच्या बोल्ड प्रिंट्स असतात.

 


.