घर सजावटीसाठी 70 च्या दशकातली ‘कॉर्क’ची जुनी पध्दत 21 व्या शतकात ठरतेय नवी फॅशन. इंटिरियर डेकोरेटर्सना पडलीये कॉर्कची भूरळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 07:03 PM2017-08-09T19:03:18+5:302017-08-09T19:09:38+5:30

70व्या दशकात कॉर्कचा उपयोग घर सजाटीत केला जात होता. मात्र सनमायका आणि इतर चमक-धमक असलेल्या शीट्सने फर्निचर इंडस्ट्रीत शिरकाव केला आणि कब्जाही केला. आता मात्र याच कॉर्कला पुन्हा 21 व्या शतकात नव्या ढंगात, नव्या रंगात पसंती लाभतेय.

Old cork decoration attracted todays interior decoraters | घर सजावटीसाठी 70 च्या दशकातली ‘कॉर्क’ची जुनी पध्दत 21 व्या शतकात ठरतेय नवी फॅशन. इंटिरियर डेकोरेटर्सना पडलीये कॉर्कची भूरळ!

घर सजावटीसाठी 70 च्या दशकातली ‘कॉर्क’ची जुनी पध्दत 21 व्या शतकात ठरतेय नवी फॅशन. इंटिरियर डेकोरेटर्सना पडलीये कॉर्कची भूरळ!

googlenewsNext
ठळक मुद्दे* कॉर्क हे लाकूडच आहे. परंतु अधिक मजबूत, अग्निरोधक असल्यामुळे याचा वापर इंटिरियरसाठी मोठ्या प्रमाणात केला जाऊ लागला आहे.* घर किंवा आॅफिसमध्ये फ्लोअरसाठी कॉर्क कार्पेटचा वापर होतोय.* किचन, आॅफिससाठी तसेच दिवाणखान्यात कॉर्क बोर्ड हा एक नवीन ट्रेण्ड घर सजावटीसाठी हिट झालाय.* कॉर्कचं बूच जमवून त्यापासून घरबसल्या अनेक कलात्मक घर सजावटीच्या वस्तू सहज बनवल्या जातात.



सारिका पूरकर-गुजराथी


असं म्हणतात की आपलं आयुष्य हे एका वर्तुळात पूर्ण होत असतं. जेथून सुरु होतं तिथेच ते संपतं. हे विधान कपडे, मेकअप, अलंकार यांच्याबाबतीतही खरं आहे तसंच ते घराच्या डेकोरेशनच्या बाबतीतही खरं आहे. याची प्रचिती आता हळूहळू यायला लागली आहे. 21व्या शतकात वावरताना सर्वकाही हटके, अत्याधुनिक, मॉडर्न हवं असं म्हणतानाच आपण केव्हा पुन्हा पारंपरिकतेकडे वळतोय हे कळतंच नाही. जेवणापासून तर पेहरावापर्यंत.. सगळ्याच बाबतीत जुनं हवहवंसं वाटू लागलंय. हॉटेलमधल्या पिझ्झापेक्षा साधं वरण-भातच जीभेवर रेंगाळतोय आणि तीच धोती सलवार, त्याच अपल कट कुर्तीज, शॉर्ट शर्ट्स. सारं जुन्या जमान्यातलंच नव्या रूपात आवडू लागलंय. घर सजावटही याला अपवाद राहिलेला नाहीये.
पूर्वी अत्तराच्या बाटल्या किंवा वाईन बॉटल्सच्या तोंडावर आत्ता दिसते तसे रबरी, सिंथेटिक फायबरचं बूच नसायचं तर एक रबरासारखे दिसणारं लाकडी बूच असायचं. यास बॉटल स्टॉपर म्हणतात. आणि या लाकडाला म्हणतात कॉर्क. तर या कॉर्कची भुरळ आता इंटिरियर डेकोरेटर्सला पडली आहे. सध्या घर सजावटीसाठी कॉर्कचा वापर खूप मोठया प्रमाणात होऊ लागलाय. घरच नाही तर आॅफिस इंटिरियरसाठीही कॉर्क मोठ्या प्रमाणात वापरलं जाऊ लागलं आहे. कॉर्कनं घर सजावटीत पर्यावरण संवर्धनासाठी मोलाचा वाटा उचलला आहे.


 

कॉर्क म्हणजे?

कॉर्क हे लाकूडच आहे. परंतु अधिक मजबूत, अग्निरोधक असल्यामुळे याचा वापर इंटिरियरसाठी मोठ्या प्रमाणात केला जाऊ लागला आहे. जगभरात सुमारे 2,200,000एकर क्षेत्रावर कॉर्कचं जंगल पसरलेलं आहे. इको फ्रेण्डली जीवनशैलीचं महत्व पर्यावरणप्रेमींबरोबरच सर्वसामान्यांना कळू लागल्यावर इको फ्रेण्डली घर सजावटीकडे त्यांचा कल वाढतोय आणि त्यासाठीच कॉर्क हा सर्वोत्तम पर्याय ठरु लागलाय. खरं तर 70व्या दशकात कॉर्कचा उपयोग घर सजाटीत केला जात होता. मात्र सनमायका आणि इतर चमक-धमक असलेल्या शीट्सने फर्निचर इंडस्ट्रीत शिरकाव केला आणि कब्जाही केला. आता मात्र याच कॉर्कला पुन्हा 21 व्या शतकात नव्या ढंगात, नव्या रंगात पसंती लाभतेय.

कसा होतोय वापर?

घर किंवा आॅफिसमध्ये फ्लोअरसाठी कॉर्क कार्पेटचा वापर होतोय. कॉर्क हे ध्वनीप्रदूषण प्रतिबंधक म्हणूनही काम करतं. म्हणूनच भिंतींवरही कॉर्कची आकर्षक सजावट करण्यावर भर दिला जातोय. फर्निचरच्या रंगसंगतीप्रमाणे साजेशे कॉर्कचे नवनवीन डिझाइन्स साकारताना दिसू लागले आहे. दिवाणखान्यापासून बाथरूमपर्यंत, बेडरूमपासून किचनपर्यंत. प्रत्येक खोलीसाठी साजेशे सजावटीचे पर्याय कॉर्कमध्ये उपलब्ध झाले आहेत.


कॉर्क बोर्ड ट्रेण्ड

किचन, आॅफिससाठी तसेच दिवाणखान्यात कॉर्क बोर्ड हा एक नवीन ट्रेण्ड घर सजावटीसाठी हिट झालाय. कॉर्क बोर्डवर फॅमिली फोटोज, सुंदर संदेश याचा कोलाज साकारून दिवाणखाण्यात लावलेला आढळतोय. तर किचनमध्ये संपलेल्या वस्तूंची यादी, एखादी छान रेसिपी, मेन्यू , टाईमटेबल यासाठीब या कॉर्कबोर्डचा वापर होतोय. या सार्यासाठी कॉर्क हाच बेस्ट आॅप्शन ठरलाय. कॉर्क बोर्डचे अनेक नवनवीन प्रकार पाहायला मिळत आहेत.

 



 

डेकोरेशनचे अमाप पर्याय

घर आणि आॅफिस सजावटीसाठी कॉर्कनं याव्यतिरिक्तही भरपूर पर्याय दिले आहेत. कॉर्कचं बूच जमवून त्यापासून घरबसल्या अनेक कलात्मक घर सजावटीच्या वस्तू सहज बनवल्या जातात. डोअरमॅट, रग, काही चित्रकृती, पेनस्टॅण्ड, बेडसाठी हेडबोर्ड, आकर्षक मांडणी करून वॉल आर्ट, टेबललॅम्प, या कलाकुसरीच्या वस्तू सहज बनवून घर सजवता येऊ लागलं आहे. यामुळे घरसजाटीला एथनिक, रस्की लूक तर मिळतोच शिवाय पुर्नवापर केल्यामुळे लाकडासारख्या महत्वाच्या नैसर्गिक साधन संपत्तीची नासाडीही टाळता येते.

मल्टीपर्पज फॅशनेबल

कॉर्क हे ट्रॅडिशनल आणि मॉर्डर्न या दोन्ही रूपात घर सजावटीत वापरले जाऊ शकते. त्यामुळे घर, आॅफिसबरोबरच रेस्टॉरण्टस, हॉटेल्स येथेही कॉर्कला मागणी वाढली आहे. म्हणूनच कॉर्क फर्निचरसाठीच नाही तर अन्य स्वरु पातही दिसू लागलं आहे. आता तर कॉर्कचे झुंबर लोकप्रिय होत आहेत. त्याचबरोबर कॉर्कचेच पेण्डण्ट दिवेही लोकप्रिय झाले आहेत. असंख्य नवनवीन डिझाइन्स यात उपलब्ध झाल्या आहेत.

Web Title: Old cork decoration attracted todays interior decoraters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.