कॉलेज जीवन हा एक महत्त्वाचा टप्पा...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2016 03:02 PM2016-06-18T15:02:08+5:302016-06-18T20:32:08+5:30

या वळणावरच प्रत्येकाला चांगल्या किंवा वाईट सवयी लागतात

College life is an important stage ... | कॉलेज जीवन हा एक महत्त्वाचा टप्पा...

कॉलेज जीवन हा एक महत्त्वाचा टप्पा...

googlenewsNext
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;"> 
 
कॉलेज जीवन हे एक वेगळे विश्व ... प्रत्येकाच्या आयुष्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा. शाळेपेक्षा येथे वेगळे वातावरण. या वळणावरच प्रत्येकाला चांगल्या किंवा वाईट सवयी लागतात. कॉलेजची प्रारंभी काहीच माहिती  नसल्याने, अनेकजण बावरुन जातात. इतरांना माहिती विचारण्याची मनात भिती किंवा कमीपणा असतो. अशा विविध शंका  कुशंका मनात घर करुन असतात. त्यातच कॉलेज लाईफ सुरु  होते. 
 
सूचना फलक बघण्याची सवय 
सूचना फलकावर विविध प्रकारच्या नोटीस लावलेल्या असतात. ती नोटीस काय आहे याची येता -जाता बघण्याची सवय करावी. त्यामध्ये परीक्षेचे वेळापत्रक, सांस्कृ तिक कार्यक्रम व त्यांच्या तारख्या, शिष्यवृत्ती अर्ज, सहली यासह महाविद्यालयात राबविण्यात येणाºया उपक्रमाची माहिती होते. त्याकरिता प्रत्येक नोटीस ही काळजीपूर्वक वाचावी. त्यामुळे परीक्षेची माहिती व राबविण्यात येणाºया उपक्रम तसेच अर्ज दाखल करण्याच्या अंतीम मुदतीचीही  माहिती होते.
 
कॉलेजची माहिती 
कॉलेजमध्ये प्रत्येक विषयाचे स्वतंत्र विभाग असतात.  त्या - त्या विभागाचे स्वतंत्र सूचना फलक असतात .त्याकरिता ते सूचना फलक पाहणे आवश्यक आहे. तसेच आॅफिस, प्रयोगशाळा, प्राचार्य, उपप्राचार्य, विभागप्रमुख , शिकविणारे प्राध्यापक. तसेच प्रत्येक कॉलेजमध्ये ग्रंथालय व त्याबाजूलाच असणारे रीडींग हॉलचीही माहिती करुन घेणे आवश्यक आहे. 
 
दिखाऊपणा करु नये
कॉलेज मित्रांमध्ये वावरतांना दिखाऊपणा करु नये, राहणीमान चांगली असावी. परंतु, सर्वापेक्षा वेगळे वाटेल असा दिखाऊपणा करु नये.  तसेच मित्र बनविताना सतर्कता बाळगणेही आवश्यक आहे. सर्व मित्रांसमोर जादा पैसे खर्च करणे म्हणजे हा एक गैरसमज आहे. खर्चिक मित्रांची संगत करतांना, दहा वेळा विचार करावा. त्यामधून केवळ पैसाच खर्च होत नाहीतर वाईट सवयी व व्यसनेही लागण्याचा मोठा धोका असतो. त्याकरिता निव्यर्सनी व ज्यांना परिस्थतीची जाणीव आहे, अशा मित्रांची संगत करावी. इतरांच्या पोशाखासोबत आपली तुलना करु नये. 
 
नियोजन महत्वाचे 
जीवनात नियोजन हे फार महत्त्वाचे आहे. मग ते वेळेचे असो किंवा पैसाचे. नियोजनामुळेच माणूस हा जीवनात यशस्वी होत असतो. त्याकरिता कॉलेजमध्ये पाऊल ठेवल्यानंतर अभ्यास, घरातील कामे तसेच मित्र यांना किती वेळ द्यावा याचे दररोजचे नियोजन आवश्यक आहे. तसेच घरातून मिळालेले पैसे नियोजनानुसारच खर्च करावेत. त्यामध्ये काटकसर करणे शिकावे, त्यामुळे उरलेले पैसे तुम्हाला कधीही उपयोगी येऊ शकतात. त्या पैशातून तुम्ही चित्रकला, गायन, वादन, आवडीचा  खेळ, ट्रेकिंग यासारखे छंद जोपासू शकतात. 
 
नक्कल  करणे टाळावे
कॉलेज जीवनात मौजमजा जरुर करावी. परंतु, लेक्चरला दांडी मारुन बाहेर कट्टयावर गप्पा मारीत बसणे टाळावे. तसेच प्रात्याक्षीक वेळेवर दाखल करण्याची सवय करावी.  अनेकजण आपल्या प्राध्यापकांची नक्कला करीत असतात. त्याउलट प्राध्यापकांचा सन्मान करायला शिका. त्यामुळे मनात त्यांच्याविषयी आदर निर्माण होऊन, शिक्षणाची गोडी लागते. 
 
सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग
दरवर्षी प्रत्येक कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमलने हे ठरलेले असतातच. यामध्ये तुम्हाच्यात जे कलागुण आहे ते सादर करून दाखवावेत. कारण ही एक व्यासपीठ मिळण्याची मोठी संधी असते. यामधून तुमच्या कलागुणांना वाव मिळून आत्मविश्वासही वाढतो. आजपर्यंत जे मोठे कलाकार घडले हे शाळा - कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून तयार झाले आहेत. त्याकरिता कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमात सहभाग नोंदविणे गरजेचे आहे.  
 
कॉलेज लाईफवर आधारित  चित्रपट 
कॉलेज लाईफ ही काही नुसती धमालाच नसते. तर त्यामधील अनेक गोष्टी आयुष्याला वळणही  लावीत असतात. त्यावर आजपर्यंत विविध चित्रपट आलेले आहेत. शाहरूख खान व काजोल यांचा ‘कुछ कुछ होता है’, २००९ मधील ‘थ्री इडियटस’ तसेच ‘रंग दे बसंती’, ‘ जाने तू या जाने ना’, ‘स्टुडंट आॅफ द इयर’ या बॉलीवूड चित्रपटातून कॉलेज जीवन हे प्रत्यक्ष कसे असते. ते वेगवेगळ्या पद्धतीने दाखविण्यात आलेले आहे

Web Title: College life is an important stage ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.