झुकेरबर्गची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 03:38 AM2018-04-17T03:38:16+5:302018-04-17T03:38:16+5:30

ऊठसूठ फेसबुकवर काहीबाही टाकून सतत सोशली कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या लाखो फेसबुक युजर्सचा डेटा लीक केल्याबद्दल मार्क झुकेरबर्ग या फेसबुक संस्थापकास अमेरिकन सिनेटमध्ये नुकतेच पाचारण करण्यात आले होते.

 Zuckerberg's Dwarf | झुकेरबर्गची झाडाझडती

झुकेरबर्गची झाडाझडती

Next

- नंदकिशोर पाटील

ऊठसूठ फेसबुकवर काहीबाही टाकून सतत सोशली कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या लाखो फेसबुक युजर्सचा डेटा लीक केल्याबद्दल मार्क झुकेरबर्ग या फेसबुक संस्थापकास अमेरिकन सिनेटमध्ये नुकतेच पाचारण करण्यात आले होते. सिनेट मेंबर्स्नी एकापाठोपाठ एक अशा कठीण प्रश्नांची सरबत्ती करून झुकेरबर्गला चांगलाच घाम फोडला. ही बातमी भारतात धडकताच आपल्याकडच्या काही खासदारांना कल्पना सुचली की, आपणही मार्कला फैलावर घेतले पाहिजे. त्यानुसार एक सर्वपक्षीय संसदीय समिती स्थापन करून तिच्यासमोर झुकेरबर्गला पाचारण करण्यात आले. समितीतील बहुतेक सदस्यांना इंग्रजी येत नसल्याने त्यांनी तोडक्या-मोडक्या इंग्रजी आणि हिंदीतून प्रश्न विचारले आणि मार्कने द्विभाषकाच्या साह्याने त्याला उत्तरे दिली. शिवसेनेच्या वतीने खासदार संजय राऊत यांनी काही रोखठोक प्रश्न विचारून झुकेरबर्गला घेरण्याचा प्रयत्न केला. पण...
राऊत: क्या आपको पता है, फेसबुक के कारण हमारे महाराष्टÑ में हजारो किसान हर साल आत्महत्या कर रहे है?
झुकेरबर्ग: बहोत दु:खद खबर है. मगर इसको फेसबुक जिम्मेदार है? आय डोण्ट बिलिव्ह..
राऊत: क्यों बिलिव्ह नही करते? सरकार की आंकडेवारी है की पिछले चार साल में आठ हजार किसानों ने सुसाईड किया!
झुकेरबर्ग: व्हेरी स्ट्रेंज...एक्सप्लेन प्लीज...
राऊत: ऐसा है की, २०१४ के चुनाव में हर भारतीय नागरिक के खाते में १५ लाख रुपया और कृषीउत्पाद के दाम दोगुणा होंगे ऐसे मेसेजेस फेसबुकपर आये थे. लोगोंने बँक खाते खुलवाए. मगर आजतक कुछ नही मिला. इसलीए किसान सुसाईड कर रहे है!
झुकेरबर्ग: मगर हम नें तो कभी ऐसा आश्वासन नही दिया! जिन्होंने दिया हो,
आप उनको क्यों नही पुछते?
राऊत: विचारले ना! पण ते तर म्हणतात, असले मेसेजेस् फेक अकाऊंटस्वरून आले असतील! ए फेकाफेकी क्यूं?
झुकेरबर्ग: डोण्ट वरी सर...वी विल कन्फर्म अ‍ॅण्ड डिलिट ईट! नेक्स्ट प्लीज...
लालूप्रसाद: (तुंरुगातून फेसबुक लाईव्ह!)
ए ससुरा फेसबुकने तो संघवादी है...दलित, पिछडे जाती के लोगों में जहर फैला रहा है... और हमको तो जेल भिजवा दिया ससुरे ने...
झुकेरबर्ग: सरजी, आपको फेसबुक ने नही कोर्ट ने जेल भेजा है...
लालूप्रसाद: ए झूठ है...हमारे खिलाफ बडा षडयंत्र हुआ है...हमने चारा खाया, चारा खाया...ऐसा झुटा प्रचार फेसबुकने किया और वो पढकर जजसाब ने हमको सजा सुनाई! बंद कर दो तुम्हारा ए फेकबुक!!
झुकेरबर्ग: आय एम व्हेरी सॉरी लालुजी.
बट ये ‘चारा’ क्या होता है?
लालूप्रसाद: वही जो हम ने नही खाया!!
झुकेरबर्ग: नेक्स्ट प्लीज...
मायावती: फेसबुक के वजह से हमारे हाथी सायकल पर चढे और युपी में कमल खिले...
झुकेरबर्ग: एलिफन्ट्स आॅल्सो आॅन फेसबुक...व्वॉव! दॅट्स ग्रेट..!! नेक्स्ट प्लीज!
शरद पवार: फेसबुकमुळे ट्रम्प अमेरिकेचे राष्टÑाध्यक्ष झाले, मोदी पंतप्रधान झाले.
माझी इच्छा पुरी कराल, तर तुम्हाला क्रिकेट बोर्डावर घेतो. बोला आहे मंजूर?
झुकेरबर्ग: इसका जवाब तो सोनियाजी, राहुलजी और मोदीजी ही दे सकते है!

(तिरकस)

Web Title:  Zuckerberg's Dwarf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.