सुभाषबापू, फेंगशुई ट्राय क्यों नही करते ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 03:28 AM2018-06-04T03:28:41+5:302018-06-04T03:28:41+5:30

इंद्रलोकांचा स्टार रिपोर्र्टर यमके मंत्रालयासमोरील धनुभाऊंच्या बी फोर बंगल्यात दाखल झाला. टीव्हीचे कॅमेरे आणि काही मोबाईल कॅमेऱ्यांच्या गराड्यात धनाभाऊ तावातावाने बोलत होते. प्रधान मंडळातील अस्वच्छ प्रधानांना ‘कवचकुंडले’ प्रदान करण्याच्या देवेंद्रभाऊंच्या स्वभावावर कडाडून हल्ला ते चढवत होते.

 Why does not Subhash Bapu, Feng Shui Troy? | सुभाषबापू, फेंगशुई ट्राय क्यों नही करते ?

सुभाषबापू, फेंगशुई ट्राय क्यों नही करते ?

Next

- राजा माने

इंद्रलोकांचा स्टार रिपोर्र्टर यमके मंत्रालयासमोरील धनुभाऊंच्या बी फोर बंगल्यात दाखल झाला. टीव्हीचे कॅमेरे आणि काही मोबाईल कॅमेऱ्यांच्या गराड्यात धनाभाऊ तावातावाने बोलत होते. प्रधान मंडळातील अस्वच्छ प्रधानांना ‘कवचकुंडले’ प्रदान करण्याच्या देवेंद्रभाऊंच्या स्वभावावर कडाडून हल्ला ते चढवत होते. जो न्याय नाथाभाऊंना तोच न्याय सुभाषबापूंना लावा ! हा मुद्दा घसा कोरडा करून मांडत होते. त्यांचे ते बाईटसत्र संपेल आणि धनुभाऊंशी आपली चर्चा होईल या विचारात असतानाच यमकेचा फोन खणाणला. ‘नारायण ! नारायण !!’ यमके फोन उचलून बोलू लागला.
नारद : शिष्यवर, धनुभाऊंच्या बंगल्यात काय रेंगाळताय ? अरे कितीतरी विषय असताना धनुभाऊंकडे काय वेळ घालवतोस?
यमके : गुरुवर्य, वेळ घालवत नाही. त्यांच्याकडून जबरदस्त माहिती घेऊन तुम्हाला रिपोर्ट देतो.
नारद : आपल्या भगिनींच्या चिक्कीपासून सुभाषबापूंच्या घरापर्यंतच्या विषयापलीकडे ते जाणार आहेत का ? थेट प्रकरणाला हात घालायला शिक. तिकडे सोलापुरात ढाकण्यांच्या अविनाशने कायद्याचा कीस पाडणारा रिपोर्ट दिलाय म्हणे ! बघ थेट तिथेच जा आणि देशमुखांच्या त्या वाड्यावर बापूंनाच गाठ.
यमके : हो, जातो गुरूवर्य !
धनुभाऊंना भेटायचा नाद सोडून सोलापुरात अवतरण्याच्या तयारीला लागण्यासाठी बी बंगल्याच्या बाहेर येत असतानाच मंत्रालयातून बाहेर पडलेल्या कळकट चेहºयाच्या एका माणसाने यमकेला हाक मारली.
माणूस : अहो, तुम्ही स्टार रिपोर्र्टरच ना ?
यमके : बोला, मीच आहे तो !
माणूस : नरेंद्रभाई माझ्या खात्यावर १५ लाख रुपये जमा करणार नाहीत म्हणे. त्यांनी १५ लाखांचा इंटरनेट डाटा चार वर्षात देऊन तो हिशोब संपविला हे खरे आहे का ?
यमके : अच्छा, म्हणजे नमोभक्तीत दंगलेल्या नमोरुग्णाची व्हिडिओ क्लिप तुम्ही पाहिली वाटतं.
माणूस : अहो, तो भक्त पेट्रोल शंभर रुपये झाले तरीही चालेल, असेही म्हणत होता. पंधरा लाखही गेले अन् महागाईनेही माझे कंबरडे मोडले. आता मी काय करू ?
यमके : चार वर्षे तर झालीत अजून एक वर्ष वाट पाहा. (एवढेच बोलून यमकेने तिथून काढता पाय घेतला व सोलापूर मोहिमेवर निघाला.) तिथे पोहोचताच भेटेल तो माणूस मालक, बापू, ब्रँडिंग ब्रँडिंग, बँक बरखास्त आणि पोलिसी कारवाई एवढेच शब्द बडबडत असताना दिसला. अखेर यमके देशमुख वाड्यावर दाखल झाला. अपेक्षेप्रमाणे तिथे बापूंचे नेहमीचे ‘यशस्वी कलाकार’ होतेच ! तेवढ्यात बापू व्हरांड्यात दाखल झाले. यमकेने लगेचच बंगल्याचा विषय छेडला. बापू बोलू लागले...
सुभाषबापू : माझ्या इमानदारीच्या पैशातून मी जागा घेतली. घर बांधले. नियम धरूनच वागणारा मी माणूस आहे. वाटलं तर गडकरीसाहेबांना विचारा ?
यमके : मग राज्यात एवढी खळबळ कशी माजली ? (हा संवाद चालू असतानाच बापूंचा एक ‘यशस्वी कलाकार’ मध्येच बोलू लागला.)
कलाकार : कितीदा बापूंना सांगितले की थोडे ज्योतिषशास्त्र, वास्तूशास्त्र बघा. पण छे ! शेवटी नागपूरहून सल्ला मिळाला. ‘बापू बंगले के लिए फेंगशुई ट्राय क्यों नही करते?

Web Title:  Why does not Subhash Bapu, Feng Shui Troy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.