‘विराट’ सातत्य...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 04:28 AM2017-11-29T04:28:49+5:302017-11-29T04:29:05+5:30

गेल्या काही वर्षांपासून भारतीय क्रिकेटचा आधारस्तंभ बनलेल्या विराट कोहलीने आपल्या कमालीच्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर दबदबा राखला आहे. क्रि केट कोणत्याही प्रकारचे असो, त्यात कोहलीच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडणार ही प्रत्येकालाच खात्री असते.

 'Virat' continuation ... | ‘विराट’ सातत्य...

‘विराट’ सातत्य...

Next

गेल्या काही वर्षांपासून भारतीय क्रिकेटचा आधारस्तंभ बनलेल्या विराट कोहलीने आपल्या कमालीच्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर दबदबा राखला आहे. क्रि केट कोणत्याही प्रकारचे असो, त्यात कोहलीच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडणार ही प्रत्येकालाच खात्री असते. सातत्य म्हणजे काय आणि ते कशाप्रकारे अमलात आणावे याचा धडाच कोहलीने सर्व खेळाडूंना दिला आहे. २०१६ पूर्वी कोहलीच्या खात्यामध्ये एकही कसोटी द्विशतकाची नोंद नव्हती. परंतु, त्यानंतर त्याने सलग चार मालिकांमध्ये प्रत्येकी एक कसोटी द्विशतक ठोकण्याचा प्रयत्न केला. तसेच, नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात आणखी एक द्विशतक झळकावले. सध्या कोहलीचा सुरू असलेला धडाका पाहता त्याला थांबवणे कोणालाच शक्य होणार नाही, असेच म्हणावे लागेल. विशेष म्हणजे त्याचे खेळाप्रति असलेले प्रेम आणि जिद्द वाखाणण्यासारखी आहे. त्यामुळेच की काय व्यस्त कार्यक्रमामुळे होत असलेल्या थकव्यानंतरही त्याच्या बॅटमधील धावांचा पाऊस काही थांबत नाही. काही दिवसांपूर्वीच कोहलीने सततच्या क्रिकेट वेळापत्रकामुळे शरीरावर अतिरिक्त ताण पडत असल्याचे कारण देत ‘मी रोबोट नाही’ असे सांगत विश्रांती मिळण्याची मागणी केली. कोहलीच्या मागणीमध्ये काहीच चुकीचे नव्हते. पण एकूणच त्याची सध्याची कामगिरी पाहता कोहली खरंच थकलेला आहे का, असा दुसरा प्रश्नही पडतो. कोहलीने राखलेली तंदुरुस्ती जबरदस्त आहे. त्यामुळेच त्याच्या खेळीपेक्षा तंदुरुस्ती कशी राखली गेली पाहिजे, हे जरी इतर खेळाडूंनी त्याच्याकडून शिकले तरी खूप झाले. विक्रमांमागून विक्र म रचताना कोहलीने स्वत:चे स्थान दिग्गजांच्या पंक्तीमध्ये सहजपणे नेले. अर्थात यामागे कोहलीच्या अफाट मेहनतीला विसरता कामा नये. तंदुरुस्तीचा विचार करताना, कोहलीने विश्रांती मिळण्याबाबत केलेले वक्तव्य गंभीरपणे घेण्याची आवश्यकता आहे. आज, इतर खेळाडूंच्या तुलनेत भारतीय क्रि केटपटू वर्षभर सातत्याने खेळत असतात. दखल घेण्याची बाब म्हणजे क्रिकेट कोणत्याही प्रकारचे असो, त्यात प्रमुख खेळाडू कोहलीच असतो. त्यामुळेच आगामी विदेशी दौºयांकडे पाहता कोहलीला विश्रांती मिळणे हे भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण, कितीही गुणवत्ता ठासून भरलेली असली, तरी शेवटी कोहली हादेखील माणूसच आहे. त्यालाही दुखापती होतात. शिवाय कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये इतर खेळाडूंची कामगिरी कशी होते हेही बीसीसीआयला पाहता येईल. कारण, पुढील विश्वचषकासाठी तयारी करताना आपल्याला सर्वच बाजूंनी विचार करणे आवश्यक आहे.

Web Title:  'Virat' continuation ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.