प्राणाच्या गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 06:25 AM2018-11-10T06:25:36+5:302018-11-10T06:26:09+5:30

प्रवाही शक्ती असल्याने प्राणाला गती असते. या दोन प्रकारच्या असतात. पहिलीला अंतर्मुख गती म्हणतात. तर दुसरी बहिर्मुख गती म्हणून ओळखली जाते.

 Speed ​​of life | प्राणाच्या गती

प्राणाच्या गती

googlenewsNext

प्रवाही शक्ती असल्याने प्राणाला गती असते. या दोन प्रकारच्या असतात. पहिलीला अंतर्मुख गती म्हणतात. तर दुसरी बहिर्मुख गती म्हणून ओळखली जाते. पहिल्या गतीद्वारे प्राण शरीरात सुषुम्नेमार्गे प्रवेश करतात. सुषुम्ना ही नाकाच्या मध्यभागी असलेली मुख्य नाडी. नंतर तो (मेंदूतील) नाडी केंद्रात संकलित होऊन क्रियाशील नाड्यांच्या माध्यमातून शारीरिक क्रियांना उपयोगी पडतो. ज्ञानेंद्रियांकडून कर्मेंद्रियांकडे असा अंतर्गत प्रवास हा अंतर्मुख प्रवास/प्रवाह. कर्मेंद्रियांकडून प्राणातले शरीर पोषक भाग साठविणे, वापरातून कर्मेंद्रियांची विहित कार्ये करणे यासाठी उपयोगात आणला जातो. वापरानं निरुपयोगी झालेला भाग प्रश्वासातून शरीराबाहेर बहिर्मुख गतीने परत पाठविला जातो. माणसाच्या सगळ्या शारीरिक क्रिया आणि मनोव्यापार प्राणामुळे कार्यान्वित होतात आणि कार्यरत राहतात. प्राण एवढा महत्त्वाचा आहे.
मादक पदार्थांमुळे शरीराची कार्यशक्ती किंचित काळ वाढून शारीरिक, मानसिक, बौद्धिक कार्यशक्ती प्रबळ झाल्यासारखी भासते. ध्यानातून, मंत्रजपामुळे महाप्राणाचे संपादन (मिळविणे) आणि संवर्धन (साठा) होऊन एक वेगळीच नशा अनुभवायला येते. मात्र ही नशा ज्ञानकोषांची ज्ञान ग्रहण शक्ती वाढविते. भौतिक मादक द्रव्यं ही ज्ञानतंतूंची हानी करून ज्ञानकोषांच्या कार्यात अडथळा, पूर्ण रूकावट आणतात. पण ध्यान-नशा ज्ञानतंतंूना सकारात्मकपणे उत्तेजित करत असल्यामुळे ते बळकट होऊन ज्ञानकोष जोमानं कार्यरत होतात. भौतिक मादक पदार्थ शरीराची कार्यशक्ती, बुद्धीचं तेज, हृदयबळ तात्पुरतं वाढवतात असा भास होतो. अंतत: हे पदार्थ या सर्वांची हानीच करतात. ध्यान-नशेमुळे शारीरिक कार्यशक्ती, बौद्धिक तेज, हृदयांतर्गत बळ कायमचं वाढतं. ध्यान धारणेमुळे शरीरकोषात सकारात्मक बदल होऊन ही बळं वाढती राहतात.
मादक पदार्थाची नशा इंद्रियांचा उन्माद वाढविते. प्राणसंपादन, वर्धनातून आलेली नशा इंद्रियातील असल्यानं अलौकिक असते. भौतिक पदार्थांची नशा उतरूनही जाते. प्राणांपासून साठलेली नशा शरीर, मन, बुद्धी यांत भरून राहते. ही नशा (वास्तविक हिला नशा म्हणण्यानं प्राणशक्तीचा अवमान करणं आहे) निर्दोष असते. निर्विकार (कोणताही विकार उत्पन्न न करणारी) असते. प्राणसंपादन, वर्धनातून जो आनंद मिळतो तो दिव्य आनंद! म्हणूनच तो ब्रह्मानंद समजला जातो.

Web Title:  Speed ​​of life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.