शास्त्री - कोहली यांची आता खरी परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 04:39 AM2017-08-16T04:39:45+5:302017-08-16T06:30:41+5:30

श्रीलंकेचा सोपा पेपर यशस्वीपणे सोडवल्यानंतर आता कोहली - शास्त्री यांची खडतर परीक्षा आफ्रिका, इंग्लंड व आॅस्टेÑलिया या ‘केंद्रां’वर होईल.

Shastri - Now the real test of Kohli | शास्त्री - कोहली यांची आता खरी परीक्षा

शास्त्री - कोहली यांची आता खरी परीक्षा

Next

- रोहित नाईक
श्रीलंकेचा सोपा पेपर यशस्वीपणे सोडवल्यानंतर आता कोहली - शास्त्री यांची खडतर परीक्षा आफ्रिका, इंग्लंड व आॅस्टेÑलिया या ‘केंद्रां’वर होईल.
टीम इंडियाने अपेक्षित ‘विराट’ कामगिरी करताना श्रीलंकेला त्यांच्याच भूमीमध्ये लोळवले. विशेष म्हणजे ३ कसोटी सामन्यांची मालिका ३-० अशी निर्विवादपणे जिंकून भारतीय संघाने परदेशात पहिल्यांदाच ‘क्लीनस्वीप’ नोंदवला. तरी ही मालिका भारतीय संघापेक्षा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासाठी मोठी कसोटी होती. कारण, या मालिकेपूर्वीच माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी कोहलीशी संबंध बिघडल्याच्या कारणावरून राजीनामा दिल्यानंतर शास्त्री यांची झालेली अपेक्षित निवड. त्यानंतर शास्त्री यांनी आपल्या पसंतीचा सहयोगी स्टाफ निवडण्यावर दिलेला भर, याकडे पाहता कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्या कामगिरीवर सर्वांचेच लक्ष होते. कारण, दोघांनीही आपआपल्या पसंतीच्या व्यक्तीची निवड करण्यावर भर दिला होता. परंतु, या मालिकेतून या दोघांनीही स्वत:ला सिद्ध करतानाच आपला निर्णय किती अचूक होता हेदेखील दाखवून दिले.
कोहली आणि शास्त्री यांच्यासह संघातील खेळाडूंनी मिळालेली संधी साध्य करताना आपली उपयुक्तता सिद्ध केली. यामध्ये सर्वात आघाडीवर आहे तो हार्दिक पांड्या. आयपीएलमध्ये क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतल्यानंतर या युवा खेळाडूने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये अचंबित करणारी फलंदाजी करून भारतीयांची मने जिंकली. मात्र, तरीही कसोटी मालिकेसाठी झालेली त्याची निवड अनेकांना खुपली. हार्दिकने मात्र आपल्या पहिल्याच मालिकेत शतक झळकावतानाच शानदार अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करून सर्वांना शांत केले. त्याच्या जोरावर अखेरचा कसोटी सामना भारताने सहजपणे जिंकला.
त्याचबरोबर, गेल्या काही मालिकांपासून फॉर्म गमावलेल्या शिखर धवनने लंकेविरुद्ध दोन शतके झळकावून पुन्हा एका ‘गब्बर’ प्रदर्शन केले. मुरली विजयसारख्या कसलेल्या सलामीवीराची उणीव भरून काढतानाच त्याने आता पुढील मालिकेसाठी विजय की धवन असा पेच निवडकर्त्यांपुढे आणि कर्णधार - प्रशिक्षकांपुढे निर्माण केला आहे. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, कोहली, लोकेश राहुल यांनीही फलंदाजीमध्ये चांगले योगदान दिले. गोलंदाजीमध्ये नेहमीप्रमाणे रविचंद्रन आश्विन आणि रवींद्र जडेजा या स्टार जोडीने लंकेची दाणादाण उडवली. विशेष म्हणजे तिसºया कसोटीत बंदीच्या कारवाईला सामोरे जावे लागलेल्या जडेजाच्या जागी संघात स्थान मिळालेल्या युवा कुलदीप यादवने ६ बळी घेत छाप पाडली. यावरून भारताची बेंच स्टेÑंथही लक्षात येते. तसेच, मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांच्या जोडीला हार्दिक पांड्या या त्रिकूटाने अचूक मारा करून यजमानांना बेजार केले. एकूणच ही मालिका श्रीलंकेसाठी पूर्णपणे निराशाजनक ठरली. माहेला जयवर्धने आणि कुमार संगाकारा यासारख्या दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीनंतर लंकेचा संघ खूपच कमजोर भासू लागला आहे. भारताविरुद्धच्या मालिकेआधी घरच्या मैदानावर तुलनेत दुबळ्या असलेल्या झिम्बाब्वेविरुद्ध लंकेला झुंजावे लागल्याने त्यांचा टीम इंडियाविरुद्ध पराभव निश्चित मानला जात होता. परंतु, इतका दारुण पराभव नक्कीच अपेक्षित नव्हता.
तरी कर्णधार म्हणून विराट कोहलीची खरी परीक्षा अजून सुरू व्हायची बाकी आहे. यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका भारतापुढे नवे आव्हान असून लंकेतील यश कर्णधार म्हणून कोहलीला नक्कीच आत्मविश्वास वाढवून देईल. तसेच, त्यानंतर इंग्लंड दौराही असल्याने मागील इंग्लंड दौºयात झालेली वाताहत या वेळी होणार नाही यासाठी कोहलीला खूप मेहनत घ्यावी लागेल. विशेष म्हणजे लंकेतील मर्यादित षटकांच्या मालिकेत विश्रांती देण्यात आलेला आश्विन इंग्लंड दौºयाच्या तयारीसाठी आतापासूनच लागला असून, यादरम्यान तो कौंटी क्रिकेट खेळायला इंग्लंडला रवाना होणार आहे. तसेच इंग्लंडनंतर खडतर असा आॅस्टेÑलिया दौराही परीक्षा पाहणार आहे. त्यामुळे श्रीलंकेचा सोपा पेपर यशस्वीपणे सोडविल्यानंतर आता कोहली - शास्त्री यांची खडतर परीक्षा आफ्रिका, इंग्लंड व आॅस्टेÑलिया या ‘केंद्रां’वर होईल.

Web Title: Shastri - Now the real test of Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.