तब्बल सात शेतक-यांनी पत्करला आत्महत्येचा मार्ग, बळीराजासाठी ठरली काळी दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:02 AM2017-10-25T00:02:35+5:302017-10-25T00:02:42+5:30

दिवाळी हा भारतीयांचा सर्वात मोठा उत्सव! यावर्षी मात्र या उत्सवाच्या धामधुमीतच, विदर्भात एक-दोन नव्हे, तर तब्बल सात शेतक-यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला.

Seven farmer suicides by suicide, who became the victim of Diwali | तब्बल सात शेतक-यांनी पत्करला आत्महत्येचा मार्ग, बळीराजासाठी ठरली काळी दिवाळी

तब्बल सात शेतक-यांनी पत्करला आत्महत्येचा मार्ग, बळीराजासाठी ठरली काळी दिवाळी

Next

दिवाळी हा भारतीयांचा सर्वात मोठा उत्सव! यावर्षी मात्र या उत्सवाच्या धामधुमीतच, विदर्भात एक-दोन नव्हे, तर तब्बल सात शेतक-यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला. अस्मानी व सुलतानी संकटांमुळे कुटुंबीयांना दिवाळीसारखा सणही साजरा करता येत नसल्याच्या वैफल्यापोटी त्यांनी शेवटी मृत्यू जवळ केला. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील वरुड बिहाडे गावातील दोन, यवतमाळ जिल्ह्यातील वाठोडा गावातील दोन आणि चंद्रपूर जिल्ह्यातील तीन शेतक-यांचा समावेश आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कृषी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये घालण्यात आलेला घोळ आणि त्यामुळे शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यात झालेला विलंब, या सात शेतकºयांच्या मृत्यूसाठी नक्कीच कुठे तरी कारणीभूत ठरला आहे. कधी काळी अवघ्या देशासाठी आदर्श ठरलेल्या महाराष्ट्रास सुमारे दोन दशकांपासून शेतकरी आत्महत्यांचा फास लागला आहे. अवर्षण, अतिवृष्टी, नापिकी, कर्जाचा बोजा, कृषिमालास योग्य दर न मिळणे, गाठीशी पैसा नसल्याने औषधोपचार न घेता येणे, आदी कारणांमुळे वैफल्यग्रस्त होऊन आजवर हजारो शेतकºयांनी स्वत:चे जीवन संपविले आहे. त्यांची संख्या एव्हाना दोन लाखांच्या घरात पोहोचली आहे. या काळात राज्याने दोन्ही प्रमुख राजकीय विचारधारांची सरकारे अनुभवली. विरोधात असताना शेतकरी हिताच्या गप्पा मारणाºयांना सत्तेची ऊब मिळाली, की त्यांना शेतकºयांचा विसर पडतो आणि सत्तेतून पायउतार झालेल्यांना शेतकरी प्रेमाचे उमाळे येतात! शेतकºयांच्या स्थितीत मात्र काहीही फरक पडत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी सोमवारी अमरावती येथे कृषी मालास दीडपट भाव देण्याची मागणी केली. तसे झाल्यास कुणीही कर्जमाफी मागणार नाही, असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नेमके हेच आश्वासन दिले होते. दुर्दैवाने ना पवारांनी त्यांच्या कारकिर्दीत दीडपट भावाची मागणी पूर्ण केली, ना मोदींनी सत्तेत आल्यावर आश्वासनाची पूर्तता केली! कृषी मालास योग्य भाव मिळाला, तर शेतकरी ना आत्महत्या करेल, ना कर्जमाफी मागेल! हे तर शाळकरी पोरांनाही कळते. त्यासाठी मोदी व पवारांसारख्या धुरंधरांची गरजच काय? त्यांच्याकडून अपेक्षा असते, ती अपेक्षापूर्तीची! जेव्हा पद असते तेव्हा काही करायचे नाही आणि पद नसताना मागण्या करायच्या किंवा आश्वासने द्यायची, ही राजकारण्यांची सवयच शेतकºयांच्या मुळावर उठली आहे. त्यांची ही सवय मोडेल तो शेतकºयांसाठी सुदिन असेल!

Web Title: Seven farmer suicides by suicide, who became the victim of Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी