‘पाकी’ गौडबंगाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2016 02:45 AM2016-10-21T02:45:05+5:302016-10-21T02:45:05+5:30

पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या कथित भ्रष्ट कारभाराच्या निषेधार्थ येत्या दोन नोव्हेंबर रोजी इस्लामाबाद बंद करण्याचा इरादा जाहीर करणाऱ्या इम्रान खान

'Paki' Gaudabangal | ‘पाकी’ गौडबंगाल

‘पाकी’ गौडबंगाल

Next

पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या कथित भ्रष्ट कारभाराच्या निषेधार्थ येत्या दोन नोव्हेंबर रोजी इस्लामाबाद बंद करण्याचा इरादा जाहीर करणाऱ्या इम्रान खान यांच्यासकट त्यांच्या पाकिस्तान तहरीक-इ-इन्साफ (पीटीआय) या पक्षाच्या बहुतेक नेत्यांना शरीफ सरकार गजाआड करण्याची शक्यता असून त्यामागे निश्चितच काही तरी गौडबंगाल असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भारतीय सैन्याने घेतलेल्या आक्रमक भूमिकेपायी शरीफ यांचे आसन तसेही डळमळीत झाले असून ते आणि लष्कर प्रमुख राहील शरीफ यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाल्याचे वृत्त अगोदरच प्रसिद्ध झाले आहे. त्याच सुमारास राहील यांना फिल्ड मार्शल म्हणून पदोन्नती देण्याची रीतसर मागणी उच्च न्यायालयात केली गेली आहे. नवाझ शरीफ यांच्या पायाखालील घसरलेली वाळू आणि त्याचवेळी इम्रान खान व पाकी लष्कर यांच्यातील सौहार्द लक्षात घेता लष्कर पुढाकार घेऊन नवाझ यांचे सरकार उलथवून लावील आणि त्याजागी इम्रान यांना बसवेल अशी चर्चा माध्यमांमधून अगोदरच सुरु झाली आहे. परिणामी तो धोका टाळण्यासाठी इम्रान खान यास अगोदरच ताब्यात घेऊन लष्करावर डाव उलटविण्याचा नवाझ यांचा बेत यामागे असू शकतो. इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी असून तिचा ताबा घ्यायचा आणि सरकारला काम करणे अशक्य करुन सोडायचे हा इम्रान खान यांच्या ‘पीटीआय’चा मक्सद आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील चीनच्या राजदूतानी इम्रान यांची जी खास भेट घेतली तिला महत्व आहे. पाकिस्तानमध्ये चीन जी गुंतवणूक करीत आहे तिला धोका होईल असे काही करु नका अशी विनंती या राजदूताने इमा्रनकडे केली आहे. अर्थात तशी शक्यता मुळीच नाही. कारण पाकमध्ये गुंतवणूक करतानाच चीनने पाकिस्तानची जी सतत पाठराखण केली आहे, त्यामुळे इम्रान व त्याचा पक्ष चीनवर सध्या निहायत खुष आहे.

Web Title: 'Paki' Gaudabangal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.