आता वाटचाल दुसऱ्या हरित क्रांतीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 06:00 AM2018-10-19T06:00:48+5:302018-10-19T06:00:50+5:30

- पी.एस. पाटील । वरिष्ठ अधिकारी, महावितरण राज्यातील शेतकऱयांना दिवसाही वीजपुरवठा उपलब्ध करून देणारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, ...

Now move to the second Green Revolution | आता वाटचाल दुसऱ्या हरित क्रांतीकडे

आता वाटचाल दुसऱ्या हरित क्रांतीकडे

googlenewsNext

- पी.एस. पाटील । वरिष्ठ अधिकारी, महावितरण

राज्यातील शेतकऱयांना दिवसाही वीजपुरवठा उपलब्ध करून देणारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, शेतकºयांना पुरेशा दाबाने वीजपुरवठा देणारी एचव्हीडीएस योजना व विद्युत वाहनांसाठी उभारण्यात आलेल्या महावितरणच्या इलेक्ट्रॉनिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन अशा तीन योजनांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. राज्यात वीजपुरवठ्याच्या उपलब्धतेला मर्यादा असल्याने जमिनीत पाणी असूनही त्या पाण्याचा उपसा करून शेतीला देण्यातील अडचणींवर मात करण्यासाठी शासनाने महावितरणच्या पुढाकाराने हाती घेतलेल्या योजनांचे फलित निकट भविष्यात पाहायला मिळणार आहे.


मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणि उच्चदाब वितरण प्रणाली योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात दुसºया हरित क्रांतीचा प्रारंभ होत आहे. राज्यातील कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी महावितरणने कंबर कसली आहे. देशात सर्वत्र विजेचे दुर्भिक्ष असताना विजेच्या मागणी आणि पुरवठ्याचा ताळेबंद साधताना तारेवरची कसरत करावी लागते. शेतीला दिवसा वीजपुरवठा व्हावा ही अनेक वर्षांपासूनची मागणी असतानाही वीजयंत्रणा सुदृढ ठेवण्यासाठी राज्यातील कृषीपंपांना दिवसा आठ आणि रात्री दहा तास अशा चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा करणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे अनेक शेतकºयांना शेती ओलितासाठी रात्री-अपरात्री जावे लागते. शेतकºयांची ही अडचण लक्षात घेता राज्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या सौरऊर्जेचा वापर दिवसा ओलितासाठी करता यावा यासाठी केलेल्या उपाययोजना म्हणजेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना. तर शेतकºयांना दर्जेदार, अखंडित आणि शाश्वत वीजपुरवठा करणारी योजना म्हणजे उच्चदाब वितरण प्रणाली योजना आहे.


राज्यातील गावठाणे आणि कृषी वाहिन्यांचे विलगीकरण झालेल्या ग्रामीण भागातील कृषी वाहिन्यांना सौरऊर्जेच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत कृषी वाहिनीवरील वीज ग्राहकांना महावितरणतर्फे सौर कृषी वाहिनीमार्फत वीजपुरवठा केला जाणार आहे. याशिवाय या वीजवाहिन्यांची देखभाल, दुरुस्ती महावितरणच करणार आहे. या योजनेच्या प्रायोगिक स्तरावरील अंमलबजावणीसाठी महावितरणने नागपूर जिल्ह्यातील खापा आणि बुटीबोरी येथे तर महानिर्मितीने अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी आणि यवतमाळ जिल्ह्यातील कोळंबी येथे सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारला आहे. शेतकºयांना सध्या दिवसा आठ किंवा रात्री दहा तास अशा चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा करण्यात येतो, मात्र आता या योजनेमुळे राज्यातील सुमारे सात लाख पन्नास हजार शेतकºयांना दिवसाही पुरेशी वीज उपलब्ध होणार आहे.


राज्यातील कृषी ग्राहकांना उच्चप्रतीचा, योग्य दाबाने व शाश्वत वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरणने उच्चदाब वितरण प्रणाली योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील २.२४ लाख कृषी ग्राहकांना उच्चदाब वितरण यंत्रणेच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्यात येणार आहे. विजेमुळे शेती आणि विजेमुळे प्रगती हे प्रत्येक राज्याच्या विकासाचे मुख्य सूत्र आहे. शेती समृद्ध करण्यासोबतच भविष्यातील काळात येणाºया आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

Web Title: Now move to the second Green Revolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.