मुत्सद्दी शरदकाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 01:31 AM2018-05-23T01:31:11+5:302018-05-23T01:31:11+5:30

कुमारला मॉनिटर केले नाही तर तुमच्या सगळ्या शाळांचे वीज-पाणी बंद करून टाकीन, अशी धमकीच पाटलांनी दिली.

Mutadidi Sharadaka | मुत्सद्दी शरदकाका

मुत्सद्दी शरदकाका

Next

- अतुल कुलकर्णी

देवावर गाढा विश्वास असणाऱ्या कुमारची ही गोष्ट. ३५ टक्के गुण मिळवलेल्या कुमारला त्याच्या वर्गातल्या सगळ्या मुलांचा पाठिंबा असतानाही, गुरु जींनी दुसºयाच मुलाला मॉनिटर करायचा निर्णय घेतला होता. का तर म्हणे त्याला १०० गुण मिळाले...! हे काय कारण झाले? कुमार चिंतेत होता. गुरु जींचे वागणे त्याला खटकत होते. पण गुरु जींवर संस्थाचालकांचा वरदहस्त होता. त्यामुळे त्यांना कुणी काही बोलले तर संस्था अध्यक्षांना राग यायचा. विचार करत करत कुमारने एक आयडिया केली. तो गेला त्याच्या विरोधात असणाºया सिद्धूकडे. त्यालाही गुरु जींच्या वागण्याचा रागच आला होता. दोघे एकत्र आले आणि दोघांनी मिळून गुरु जींच्या निर्णयाच्या विरोधात गावातल्या पाटलांकडे जायचे ठरवले. गावातले पाटीलही गुरु जींवर कातावलेले होते. संस्थाचालकांच्या मनमानीमुळे पाटलांचा त्या संस्थाचालकांवर तसाही राग होताच.
कुमारला मॉनिटर केले नाही तर तुमच्या सगळ्या शाळांचे वीज-पाणी बंद करून टाकीन, अशी धमकीच पाटलांनी दिली. एका मॉनिटरमुळे आपल्या बाकीच्या शाळा अडचणीत येतील म्हणून संस्थाचालकही विचारात पडले होते. इकडे गुरु जी तर बोलून बसले होते. त्यामुळे व्यवहारात येडा पण पुस्तकात हुशार असणाºया त्या मुलाला मॉनिटर नाही केले तर आपली पंचाईत होणार म्हणून
गुरु जी परेशान झाले होते. अखेर त्या शाळेशी आणि गावाशी काडीचा संबंध नसणारे शेजारच्या गावातले एक शरदकाका सगळ्यांच्या मदतीला आले. ते तसे कुणाचे मित्र आणि कुणाचे शत्रू हे त्यांच्या मित्रांना आणि शत्रूंनाही कळत नसे.
संस्थाचालकांची प्रतिष्ठा राखली जाईल, असे त्यांना वाटत पाहिजे. आपला शब्द वाया जाऊ नये, असे गुरुजींना वाटत होते. कुमार मॉनिटर झाला पाहिजे, असं त्याच्या वडिलांना वाटत होते, आणि हे सगळं करताना कुमारला मदत करणारा सिद्धूदेखील जे घडलं ते शरदकाकांमुळे घडलं, ते नसते तर सगळं कठीण झालं असतं, असं त्यांच्या दिल्लीच्या राहुलदादाला सांगण्यासाठी गेला पाहिजे, अशी खेळी खेळायचे शरदकाकांनी ठरवले. त्यांनी संस्थाचालकांना गाठले, त्यांच्या कानात काही तरी सांगितले... आणि काय आश्चर्य, त्या हुशार मुलाने वर्गात जाऊन सांगितले, मला नाही मॉनिटर व्हायचे, मला अजून खूप अभ्यास करायचाय, आणि त्याबरोबर सगळे प्रश्न सुटले...!
गुरु जी खूश, संस्थाचालक खूश, सिद्धूचे दिल्लीतले नातेवाईक खूश... सगळे शरदकाकाचे नाव घेऊ लागले...! मात्र आपण या गावचेच नाही असे म्हणत शरदकाका पुढच्या कामाला निघून गेले.
ही बातमी कळताच गोवा, मणिपूर आणि मेघालयमधील शाळेत असेच प्रकार घडले. पण त्यावेळी कुणी कसे लक्ष दिले नाही, अशा बातम्या सुरू झाल्या. मात्र त्यावेळी शरदकाका गप्प होते की कुणी त्यांच्याकडे मदत मागायलाच गेले नव्हते की दिल्लीत राहणाºया त्या संस्थाचालकांनी त्यावेळी शरदकाकांना गप्प बसायची विनंती केली होती की त्यावेळी काकांनाच ठरवून गप्प बसायचे होते, यावर आता चर्चा सुरू झालीय. त्या संस्थाचालकांच्या शाळांबद्दल कधी, किती व कुणी बोलायचे याचे वर्ग आता शरदकाका सुरू करणार आहेत, अशीही एक पुडी कुणी तरी सोडल्याचे ऐकीवात आहे... किती लक्ष द्यायचे ते ज्याचे त्याने ठरवावे...!

Web Title: Mutadidi Sharadaka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.