ममताही ‘त्याच’ मार्गावर..

By admin | Published: October 1, 2014 01:41 AM2014-10-01T01:41:15+5:302014-10-01T01:41:15+5:30

मुख्यमंत्रिपदावर आरूढ झाल्यानंतरही आपल्या जुन्याच मारुती 800या गाडीतून फिरणा:या ममता बॅनर्जी या कोणत्याही त:हेच्या आर्थिक घोटाळ्यात अडकल्या नसाव्यात असेच आजवर सारे समजत आले.

Mamta on the 'same' path .. | ममताही ‘त्याच’ मार्गावर..

ममताही ‘त्याच’ मार्गावर..

Next
>सर्वसामान्य बंगाली ी नेसते तशी साधी सुती ‘टोंगई’ नावाची साडी नेसणा:या, पायात रबरी स्लिपर्स घालणा:या आणि मुख्यमंत्रिपदावर आरूढ झाल्यानंतरही आपल्या जुन्याच मारुती 800या गाडीतून फिरणा:या ममता बॅनर्जी या कोणत्याही त:हेच्या आर्थिक घोटाळ्यात अडकल्या नसाव्यात असेच आजवर सारे समजत आले. त्यांच्या चेह:यावर सदैव झळकणारा संताप आणि त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होणारा आक्रस्ताळेपणा या गोष्टीही त्यांची ती प्रतिमाच अधोरेखित करणा:या होत्या. पण शारदा चिटफंड हा 1क् हजार कोटींचा घोटाळा पुढे आला आणि ममताबाईंची सारी प्रतिमाच त्यांच्या प्रतिष्ठेसह मलीन होऊन गेली. हा घोटाळा त्यांच्याच पक्षाचे एक खासदार सोमेन मित्र यांनी प्रथम केंद्र सरकारच्या लक्षात आणून दिला. त्या वेळी त्यांना बोलवून ‘राज्याच्या कोणत्याही कामात तुम्ही लक्ष घालू नका’ असे ममताबाईंनी त्यांना खडसावले. पुढे मानभावीपणा करीत त्यांनी या घोटाळ्याची चौकशी करायला राज्य सरकारचीच एक समिती स्थापन केली. ही समिती नेहमीसारखी कामचलाऊपणा व दफ्तरदिरंगाई करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) हे प्रकरण आपल्या हाती घेतले. त्यासमोर साक्ष देताना तृणमूल काँग्रेसचेच दुसरे राज्यसभा सदस्य कुणाल घोष म्हणाले, ‘या सबंध प्रकरणात जर कोणा एका व्यक्तीचा सर्वाधिक फायदा झाला असेल तर ती व्यक्ती ममता बॅनर्जी हीच आहे.’ तीन वर्षापासून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि आता त्याच्या सा:याच बाजू देशासमोर आल्या आहेत. या काळात ममता बॅनज्रीना देशाच्या पंतप्रधानपदाची स्वप्ने पडत होती. भ्रष्टाचार निमरूलनाचा ङोंडा उंच आकाशात फडकावणारे अण्णा हजारे यांनाही ममता बॅनर्जी यांचे शुद्ध असणो व त्या पंतप्रधानपदाला लायक असणो भावले होते. लोकसभेच्या निवडणुकीत त्याचमुळे त्यांनी बंगालबाहेर आपल्या पक्षाचे 46 उमेदवार उभे केले. (त्यातल्या 45 जणांची अमानत जप्त झाली ही गोष्ट वेगळी) आता उघड झालेल्या माहितीनुसार शारदा घोटाळ्यात 17 लाख सामान्य बंगाली माणसांचे पैसे बुडाले आहेत. या चिटफंडाच्या संचालकांनी त्याच्या शाखा बंगालसोबतच ओडिशा, आसाम, झारखंड या राज्यांतही उघडल्या आहेत. लोकांकडून पैसे जमा करताना त्यांना दरसाल 2क् ते 24 टक्के एवढे व्याज देण्याचे या संचालकांनी मान्य केले आहे. आपल्या एजंटांना त्यांनी 35क्क् कोटी रुपये कमिशनच्या स्वरूपात दिले, तर 2क्क्क् कोटी आपल्या व्यवस्थापनावर खर्च केले. एक हजार कोटी रुपये गुंतवून त्यांनी दोन दूरचित्रवाहिन्या सुरू केल्या आणि 2क्क्क् कोटी रुपये जमीन खरेदीत गुंतवले. मिथुन चक्रवर्ती या सिनेनटाला दरमहा 2क् लाख रुपये देऊन आपले ब्रँड अॅम्बेसेडर बनविले आणि वर त्याला 7 कोटींचा बोनसही देऊ केला. या फंडाचे मुख्य संचालक सुदिप्तो सेन याला ममताबाईंनी राज्यसभेची खासदारकी देऊ केली. आजच्या घटकेला त्यांच्या मंत्रिमंडळातील मदन मित्र व अमित मित्र हे दोन मंत्री; कुणाल घोष, संजय बोस आणि अहमद हसन इम्रान हे राज्यसभा सदस्य; अर्पिता घोष ही लोकसभा सदस्य तर रजत मुजुमदार, बापी करीम, आसीफ खान हे अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात आहेत. त्यातल्या काहींना अटक झाली आहे आणि या सा:या प्रकाराच्या संशयाची सुई ममताबाईंवर रोखली आहे. केंद्रात रेल्वेमंत्री असताना त्यांनी या शारदा ग्रुपला एक मोठे कंत्रट दिले आणि तेव्हापासून त्यांच्या आर्थिक व्यवहाराला सुरुवात झाली. शारदा फंडाने ममताबाईंच्या पक्षाला निवडणुकीत प्रचंड आर्थिक मदत केली, त्यांच्या पक्षाच्या खासदारांना, आमदारांना आणि महापालिकेच्या सभासदांनाही हवा तेवढा पैसा पुरविला. त्यांचा प्रवासखर्च, हॉटेलची बिले यासारख्या गोष्टीही या फंडाने प्रायोजित केल्या. आपल्या सर्व वाहिन्या ममताबाईंच्या प्रचारासाठी तर त्याने वापरल्याच पण त्यांची तैलचित्रे काढून घेण्यासाठीही कित्येक दशलक्ष रुपये खर्ची घातले. हे प्रकरण अंगलट येऊ लागले तसा ममताबाईंचा थयथयाटही वाढला. जयललिता या दुस:या महिला मुख्यमंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगात गेल्यापासून ममताबाईंचा आक्रस्ताळेपणा कमालीचा वाढलाही आहे. आपल्या कोंडीला भाजपा व काँग्रेस हे पक्ष जबाबदार आहेत आणि जमेल ते करून आपल्याला पदभ्रष्ट करण्याच्या प्रयत्नात गुंतले आहेत असा कांगावा ममताबाईंनी चालवला आहे. डाव्या कम्युनिस्ट पक्षाला सत्तेवरून खाली खेचल्यापासून ममताबाईंची उंचावत गेलेली लोकप्रियता शारदा फंडाने एकाएकी खाली आणली आहे. सन 2क्16 मध्ये प. बंगालात निवडणुका व्हायच्या आहेत. तोर्पयत या फंडाचा निकाला लागला नाही तर ती निवडणूकच बाईंचा निकाल लावील, असे लोक बोलू लागले आहेत. 

Web Title: Mamta on the 'same' path ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.