भावनिक फिटनेस जपताना...

By admin | Published: May 1, 2016 03:13 AM2016-05-01T03:13:01+5:302016-05-01T03:13:01+5:30

आजकाल आपण अनेकांना जीमला जाताना पाहतो़ बागेत आपल्याला जमेल त्या स्पीडने वॉक घेताना पाहतो. कुणी जॉगिंग करत असतं. कुणी स्विमिंग करत असतं़ थोडक्यात शारीरिक

Giving emotional fitness ... | भावनिक फिटनेस जपताना...

भावनिक फिटनेस जपताना...

Next

- डॉ. शुभांगी रघुनाथ पारकर

आजकाल आपण अनेकांना जीमला जाताना पाहतो़ बागेत आपल्याला जमेल त्या स्पीडने वॉक घेताना पाहतो. कुणी जॉगिंग करत असतं. कुणी स्विमिंग करत असतं़ थोडक्यात शारीरिक फिटनेसची जागृती आपल्याला लोकांमध्ये दिसते आहे़ मात्र काहींच्या बाबतीत शारीरिक आरोग्य निसर्गाने जन्मत:च दिले आहे़ तर काहींना ते मिळविण्यासाठी खूप मेहनत करावी लागते़ पण हा भावनिक फिटनेस जपणे खूप महत्त्वाचे आहे.

भावनिक आरोग्याचा फिटनेस मिळवायचा म्हणजे काही गोष्टींची पथ्य पाळली पाहिजेत, मनाचे आरोग्यदायी डाएट घेतले पाहिजे. काही गोष्टी आवर्जून टाळल्या पाहिजेत. काही मानसिक व्यायाम केले पाहिजेत़ अगदी उत्तम शारीरिक आरोग्य असलेल्या माणसालाही अनेक वेळा भावनिक अस्वस्थता जाणवते़, उदास वाटते़, मानसिक आरोग्याच्या समस्या जाणवतात़ म्हणजे उत्तम शारीरिक फिटनेसमुळे भावनिक फिटनेस किंवा मानसिक आरोग्य मिळेल याची खात्री देता येत नाही़ आपण आपल्या जीवनाबद्दल कशा प्रकारे अनुभव घेतो़ आपली आयुष्याची फिलॉसॉफी कशी असावी याबद्दल सकारात्मक निर्णय घेऊ शकतो़

आपल्याला खऱ्या अर्थाने गरज असते ती
या सगळ्या नकारात्मक घटनांना आपल्या मनाच्या ऊर्जेने स्वीकारत त्यांच्याशी सामना करत आपले जीवन आपल्या मूल्यांबरोबर आपल्या तत्त्वांनुसार जगत एक समाधानी आयुष्य जगायचे. हा ध्यास घेत आपल्या भावनिक बाहूंना समर्थ बनवायचे. याला भावनिक फिटनेस म्हणतात. माणसाच्या जीवनात अनेक स्थित्यंतरे होत असतात, अनेक अवास्तव मागण्या डोके वर काढत असतानाही आपल्या भावनांचा आवेग सांभाळत, डोकं शांत ठेवत मार्गक्रमण
करीत राहायचे आणि संकटांची नदी पार करीत काठावर पोहोचायचे म्हणजेच
भावनिक फिटनेस.

आपण शारीरिक फिटनेस मिळविण्यासाठी खूप कष्ट करतो़ तसेच भावनिक फिटनेससाठीही खूप प्रयत्न करावे लागातत़ मनाला ट्रेन करावे लागते़ जसे काही विशिष्ट एरोबिक्स करून पोटावरची अनावश्यक चरबी कमी करून आपण शरीराला एक छान आकार देतो तसेच मनावर असलेला अनावश्यक ताण कमी करून मानसिक शुचिता सांभाळणेही महत्त्वाचे आहे. जेवढे आयुष्य आपल्याकडे आहे ते आनंददायी व समाधानी ठेवणेही आवश्यक आहे़ यासाठी भावनिक फिटनेस म्हणजे काय ते समजणे आवश्यक आहे़
आपल्या आयुष्यात अनेकवेळा भावनिक गुंता होत असतो़ आपले मन पूर्ण कोलमडलेले असते़ प्रचंड विवादात नाती अडकलेली असतात़ कौटुंबिक सुख संपलेले असते़ अचानक गंभीर आजारामुळे आयुष्यात वादळ येते़ अशावेळी मनाची समतोल स्थिती सांभाळणे तसेच भावनांचा सामना करणे कठीण होऊन जाते़ आपण आपल्या त्या दु:खी संतापी, अपराधी भावना टाळायचा प्रयत्न करतो़ त्यांना मनात दाबून टाकतो़ त्यांचा भावनांशी भिडणे मनाला जमत नाही़ पुढे काय होईल ही चिंता मनाला एका चक्रव्यूहात फसविते़ आपण या भयानक भावनांच्या तळाशी फसलेले असतो़ वास्तवाच्या काठावर येऊन या भावनांच्या आरशात आपल्याला आपले प्रतिबिंब पाहणे जमत नाही़ या दुखवणाऱ्या भावनाच्या मागे असलेल्या प्रश्नाची उत्तरे शोधायलाच आपण घाबरतो. कारण या प्रश्नांची उत्तरे चुकतील की काय? या सगळ्याला आपणच कारणीभूत नाही ना, हा दारुण प्रश्न आपल्या सतावततो़ पण आपल्या या त्रासदायक छळणाऱ्या भावनांना नाकारून त्यांचे अस्तित्व आपल्याला संपविता येत नाही़ कितीही लपविण्याचा प्रयत्न केला तरी डोके वर काढतातच़ माणसाच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी त्याच्या मनाप्रमाणे होतात असे नाही. पण काहीही करून त्यांचा आपल्याला आवडेल अशा पद्धतीने बंदोबस्त करणे हे तात्पुरते उत्तर आहे़ आपल्या बाह्य जगातील गोष्टी उदाहरणार्थ बिघडलेली नाती, नावडती नोकरी, आर्थिक संकटे या गोष्टी स्वत:ला अंतर्मनातून न बदलता स्थिरावयाचा प्रयत्न केला तर तो अमर्याद प्रयत्न होईल़ आपली सगळी ऊर्जा सतत या गोष्टी कशा बदलायच्या़ आपल्या मर्जीप्रमाणे कशा हाताळायच्या यातच नष्ट होईल़ आपण यात गुंतून जाऊ.
कारण आपले सारे लक्ष बाह्य जगातील गोष्टी आपल्या इच्छेनुसार घडविण्याकडे असेल; पण ज्या क्षणी आपण या दुर्दैवी बाह्य परिस्थितीकडे व अनेकविध नकारात्मक प्रसंगांकडे पाहण्याच्या आपल्या नजरेला बदलू तेव्हा जे बदल होतील ते विधायक बदल नैसर्गिकरीत्याच होतील़ सर्वसामान्यपणे आपल्या शरीरात होणाऱ्या जखमांना भरून काढायची एक नैसर्गिक शक्ती आहे़ हे सत्य मानले तर आपल्या मानसिक वेदनांनासुद्धा शमन करायची भावनिक ताकद आपल्यात आहे हे आपल्याला पटेल़
सकाळी आपला दिवस जेव्हा सुरू होतो तेव्हा एक प्रश्न आपण स्वत:ला प्रामाणिकपणे विचारला पाहिजे की, आपल्या जीवनातले घायाळ करणारे अनेक क्षण आपण सहज झेलू शकतो का? ते दु:खीकष्टी क्षण सहन करून आपल्याला आंतरिक समाधान व शांती देणारी अखंड ऊर्जा आहे का? अगदी प्रामाणिक उत्तर मिळेल की नाही म्हणून तर भावनिक फिटनेस बनविण्याकडे कल असण्याची गरज आहे. (क्रमश:)

Web Title: Giving emotional fitness ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.