‘लोकल’मध्ये ‘गारवा’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 03:12 AM2017-12-25T03:12:10+5:302017-12-25T03:12:18+5:30

एरवी कोंडवाडा किंवा दाटीवाटी हाच नित्याचा अनुभव असलेल्या लाखो लोकल प्रवाशांना आता गारव्याचा अनुभव घेता येणार आहे. उपनगरीय मार्गावरील ७५ लाख प्रवाशांना स्वप्नवत वाटणारी वातानुकूलित रेल्वे अर्थात एसी लोकल

'Garwa' in 'Local'! | ‘लोकल’मध्ये ‘गारवा’!

‘लोकल’मध्ये ‘गारवा’!

Next

एरवी कोंडवाडा किंवा दाटीवाटी हाच नित्याचा अनुभव असलेल्या लाखो लोकल प्रवाशांना आता गारव्याचा अनुभव घेता येणार आहे. उपनगरीय मार्गावरील ७५ लाख प्रवाशांना स्वप्नवत वाटणारी वातानुकूलित रेल्वे अर्थात एसी लोकल नाताळचे सगळ्यात मोठे आकर्षण ठरले आहे. अनेक अडचणींचा, आव्हानांचा सामना करत रेल्वे प्रशासनाने हा प्रकल्प हाती घेतला. सुरुवातीला एसी लोकलला विरोधही झाला; मात्र तो झुगारून एसी लोकल मुंबईच्या उपनगरीय मार्गावर धावण्यासाठी सज्ज झाली आहे. मध्य रेल्वेची प्रवासी संख्या ४० लाखांच्या घरात पोहोचलीय, तर पश्चिम रेल्वेची प्रवासी संख्या आहे ३५ लाख. आता पहिली वातानुकूलित लोकल चालवण्याचा मान पश्चिम रेल्वेला मिळाला आहे. मात्र, हे तितकेच आव्हानात्मक आहे, याची जाणीव रेल्वे प्रशासनालादेखील आहे. त्यामुळे सुरुवातीला शनिवार आणि रविवार वगळून केवळ १२ फेºया चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. एसी लोकलच्या देखभालीसाठी तज्ज्ञ मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. पहिल्यांदाच धावणाºया एसी लोकलसाठी प्रवाशांचा तुफान प्रतिसाद मिळणार, यात शंकाच नाही. तथापि, हीच ‘एसी लोकल’ भविष्यातील मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेची ‘दशा आणि दिशा’ ठरवणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे. महामंडळ एमयूटीपी-३ अंतर्गत ५६४ बोगी उपनगरीय रेल्वे ताफ्यात दाखल करणार आहे. यापैकी ४७ एसी बोगीसाठी नीती आयोग आणि रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळालेली आहे. एमयूटीपी-३ अंतर्गत ५६४ बोगींसाठी जागतिक बँकेकडून अर्थसाहाय्य उपलब्ध होणार आहे. एमयूटीपी-१ आणि एमयूटीपी-२ प्रमाणे जागतिक निविदा मागवून ही प्रक्रिया पूर्ण होईल. एसी लोकलच्या प्रस्तावानंतर ती सेवेत दाखल होण्यासाठी प्रदीर्घ कालावधी लागला आहे. यामुळे अधिकाºयांसह कर्मचारीवर्ग सध्या प्रचंड तणावाखाली आहे. एकदा का एसी लोकल समर्थपणे धावली तर हा तणाव ओसरेल, यात शंका नाही. सुरुवातीला एसी लोकल (रेक)ची किंमत सुमारे ११० कोटी असल्याचे समोर आले. मात्र रेल्वे प्रशासनाने एजन्सीकडून सुट्टे भाग मागवून लोकल बांधणीचा सुज्ञ निर्णय घेतला. यामुळे एसी लोकलची किंमत सुमारे ६० कोटींपर्यंत खाली आणण्यात प्रशासनाला यश आले. आता प्रशासन एसी लोकलच्या देखभालीसाठी विशेष प्रयत्न करत आहे. सुरुवातीला १२ फेºयांत उपनगरीय सेवेत एसी लोकल धावेल. स्वयंचलित दरवाजे आणि प्रवासी यांची ‘नाळ’ जुळल्यास लवकरच ११ फेºयांचा अधिक विस्तार करण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे, तर दुसरीकडे एसी लोकलचा गारवा घेण्यासाठी मुंबईकर मात्र सज्ज झालेत.

Web Title: 'Garwa' in 'Local'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.