‘अभिजात’ मराठीसाठी पंतप्रधान कार्यालय कृतिशील व्हावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 05:34 AM2018-01-12T05:34:06+5:302018-01-12T05:34:17+5:30

नव्या वर्षात मराठी भाषा दिनापूर्वी अभिजात दर्जा मिळाल्याची आनंदाची बातमी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी सर्व सोपस्कार पूर्ण झाले आहेत. आता पंतप्रधान कार्यालयाने कृती करून गतिमान प्रशासनाचे उदाहरण घालून द्यावे, ही माफक अपेक्षा आहे.

'Classical' to become Prime Minister's office for Marathi! | ‘अभिजात’ मराठीसाठी पंतप्रधान कार्यालय कृतिशील व्हावे!

‘अभिजात’ मराठीसाठी पंतप्रधान कार्यालय कृतिशील व्हावे!

Next

- विजय बाविस्कर


नव्या वर्षात मराठी भाषा दिनापूर्वी अभिजात दर्जा मिळाल्याची आनंदाची बातमी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी सर्व सोपस्कार पूर्ण झाले आहेत. आता पंतप्रधान कार्यालयाने कृती करून गतिमान प्रशासनाचे उदाहरण घालून द्यावे, ही माफक अपेक्षा आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठीची कृतिशील कार्यवाही विचाराधीन आहे, असे पत्र पंतप्रधान कार्यालयातील सांस्कृतिक मंत्रालय सचिवांचे विभागीय अधिकारी कुमार शैलेंद्र यांनी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांना पाठविले आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी प्रा. रंगनाथ पठारे समितीने सर्व बाबींची पूर्तता केल्यानंतर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात मसापने पुढाकार घेतला. त्यासाठी लोकचळवळ उभी केली. लेखकांची बैठक, मसापचे सातारा जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी यांनी शाहूपुरी शाखेमार्फत पंतप्रधान कार्यालयाला पाठविलेली एक लाखाहून अधिक पत्रे, मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाबाबत भूमिका घ्यावी, यासाठी मसापच्या शिष्टमंडळाने घेतलेली आक्रमक भूमिका यामुळे धूळखात पडलेल्या अभिजात भाषेसाठीच्या प्रस्तावावर कार्यवाही सुरू झाली. सहा महिन्यांपूर्वी मसापने पाठविलेल्या पत्राला उत्तर देताना मद्रास उच्च न्यायालयातील याचिका निकाली निघाल्याने सांस्कृतिक कार्यालयाला सुधारित कॅबिनेट नोट तयार करण्याचा आदेश देण्यात आल्याचे कळविण्यात आले होते. पण, त्यानंतर कोणतीच ठोस कार्यवाही न झाल्यामुळे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी पुन्हा ८ डिसेंबर रोजी पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार करून, नवीन वर्षात मराठी भाषा दिनापूर्वी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे ठोस आश्वासन द्यावे; अन्यथा २६ जानेवारी रोजी दिल्लीत मराठीप्रेमींसमवेत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तसे पत्रही पंतप्रधान कार्यालयाला पाठविले होते. या आंदोलनात छत्रपती घराण्याचे वारसदार या नात्याने सहभागी होण्याचा निर्णय साताºयाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला होता. परिषदेच्या पत्राला उत्तर देताना अभिजात दर्जाच्या कृतिशील कार्यवाहीसाठी केंद्र सरकार विचाराधीन असल्याचे कळविण्यात आले आहे. पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे, बडोदा येथे होणाºया ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड यांचा सत्कार डॉ. पी.डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या समारंभात प्रा. मिलिंद जोशी यांनी आपल्या भाषणात ‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठीच्या प्रयत्नांत महाराष्ट्रातील राजकीय इच्छाशक्ती अपयशी ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बडोद्यातून निवडणूक लढविताना आपल्या स्वाक्षरीने उमेदवारी अर्ज भरला होता. आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याच्या पत्रावर पंतप्रधानांची स्वाक्षरी आपण घ्यावी,’ असे भावनिक आवाहन केले. त्याला राजमातांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन ‘या कामासाठी निश्चित पुढाकार घेईन,’ असे आश्वासन दिले. त्यामुळे मराठी भाषकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. नव्या वर्षात मराठी भाषा दिनापूर्वी अभिजात दर्जा मिळाल्याची आनंदवार्ता मिळणार का, याकडे मराठी जगताचे लक्ष लागले आहे. मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी सर्व सोपस्कार पूर्ण झाले आहेत. आता पंतप्रधान कार्यालयाने कृती करून गतिमान प्रशासनाचे आदर्श उदाहरण घालून द्यावे. बडोद्याच्या संमेलनात पंतप्रधानांना निमंत्रित करण्याचा संयोजकांचा मानस आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा झाल्यास हे संमेलन ऐतिहासिक ठरेल.
 

Web Title: 'Classical' to become Prime Minister's office for Marathi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marathiमराठी