साक्री परिसरात प्रेमीयुगुलाची गळफास घेवून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:01 PM2017-12-19T12:01:26+5:302017-12-19T12:02:06+5:30

धाडणे फाट्यावरील घटना : पोलीस तपासाला सुरुवात

Suicide by taking a lover of love lover in Sakri area | साक्री परिसरात प्रेमीयुगुलाची गळफास घेवून आत्महत्या

साक्री परिसरात प्रेमीयुगुलाची गळफास घेवून आत्महत्या

Next
ठळक मुद्देप्रेमीयुगुलाने केली गळफास घेवून आत्महत्या़साक्री तालुक्यातील धाडणे फाट्यावरील घटनापोलिसांच्या तपासाला सुरुवात 

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : साकी तालुक्यातील धाडणे फाट्यावर एका प्रेमीयुगुलाने वडाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली़ ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे़ 
नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गालगत साक्री ते पिंपळनेर रोडवर असलेल्या धाडणे गावाच्या फाट्यालगत एका वडाचे झाड आहे़ या झाडाला धाडणे (ता़ साक्री) येथील कैलास रमेश बागुल आणि नाशिक जिल्ह्यातील कळवळ तालुक्यातील दिपाली सोमनाथ चव्हाण (गाव माहित नाही) या प्रेमीयुगुलाची नावे पुढे येत आहेत़ त्यांनी झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला आणि आपल्या प्रेमाला पुर्णविराम दिला़ ही घटना सोमवारी रात्री घडली असावी असा अंदाज असून मंगळवारी सकाळी ही बाब उघडकीस आली़ या घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली आहे़ घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी भेट दिली आहे़ प्रेमीयुगुलांबद्दल माहिती संकलित करण्याचे काम सुरु आहे़ घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत़

Web Title: Suicide by taking a lover of love lover in Sakri area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.