धुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 11:36 AM2018-10-20T11:36:23+5:302018-10-20T11:37:37+5:30

पाणी टंचाई निवारण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना

A resolution to declare drought in Dhule district | धुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव

धुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात अनेक गावांना पाणी टंचाईटॅँकर भरण्यासाठी पाणी नाहीआतापासूनच उपाययोजना करण्याची गरज

आॅनलाइन लोकमत
धुळे- जिल्ह्यात यावर्षी झालेल्या असमाधानकारक पावसामुळे खरीपाचे उत्पन्न हातचे गेले आहे. आतापासूनच अनेक ठिकाणी पाणी,चारा टंचाई भेडसावू लागली आहे. दुष्काळी तालुक्यात फक्त धुळे, शिंदखेडा तालुक्याचाच समावेश केलेला आहे. मात्र संपूर्ण जिल्ह्यात  परिस्थिती गंभीर असल्याने, जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सदस्यांनी केल्याने, जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. दरम्यान शिक्षण विभागातील ९ सेवानिवृत्त कर्मचाºयांचे प्रवास देयके जि.प.फंडातून देण्याचा विषय तूर्त तहकूब करण्यात आला.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा  कै.यशवंतराव चव्हाण सभागृहात जि.प. अध्यक्ष शिवाजी दहिते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. व्यासपीठावर उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, समाज कल्याण सभापती मधुकर गर्दे, शिक्षण सभापती नूतन निकुंभ, पशुसंवर्धन सभापती लिला बेडसे, उपस्थित होत्या. 
जिल्ह्यात यावर्षी असमाधानकारक पाऊस झालेला आहे. अनेक गावांना पाणी टंचाई भेडसावू लागलेली आहे. चाºयाचाही प्रश्न गंभीर झालेला आहे. एवढी भीषण स्थिती असतांना प्रशासनातर्फे फक्त धुळे, शिंदखेडा तालुक्यातच दुष्काळ असल्याचे सांगण्यात येते. मात्र शिरपूर, साक्री तालुक्यातही अनेक गावांमध्ये पाणी, चारा टंचाई आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातच दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. 
कृती आराखडा तयार करावा
बैठकीत मधुकर गर्दे यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित केला. जिल्ह्यात अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. आगामी काळात पाण्याचा टॅँकर कुठून भरावा, कोणती विहिर अधिग्रहित करावी असा प्रश्न निर्माण होऊ शकेल. त्यामुळे आतापासूनच उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यावर शिवाजी दहिते यांनी अधिकाºयांना तालुकानिहा बैठका घेऊन कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या. साक्री तालुक्यातील म्हसदी येथेही २०-२५ दिवसानंतर पाणी मिळते. येथील पाणी प्रश्नावरही चर्चा झाली. 
गुरांच्या संख्येनुसार टॅँकर वाढवावे
जिल्ह्यात ज्या ठिकाणी टॅँकर सुरू आहे, ते केवळ दरडोईच्या हिशोबानुसारच आहे. मात्र जिल्हयात गुरांच्या चाºयाबरोबरच गुरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झालेला आहे.त्यामुळे गुरांच्या संख्येनुसारच टॅँकर वाढवावे अशी सूचना सदस्यांनी केली. दरम्यान पाणी टंचाई असल्याने विटाई गावात केवळ एकचवेळ जनावरांना पाणी पाजले जाते असेही सांगण्यात आले. 



 

Web Title: A resolution to declare drought in Dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे