बडोद्याच्या संमेलनात राजवाडे मंडळाचा स्टॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 07:20 PM2018-02-15T19:20:14+5:302018-02-15T19:20:59+5:30

दुर्मिळ प्रकाशन : सर्जेराव भामरे यांची माहिती

Rajwade Mandal's Stall in Baroda Sammelan | बडोद्याच्या संमेलनात राजवाडे मंडळाचा स्टॉल

बडोद्याच्या संमेलनात राजवाडे मंडळाचा स्टॉल

Next
ठळक मुद्देबडोद्यात राजवाडे संशोधन मंडळाचा स्टॉलस्टॉल राहणार १६ ते १८ फेब्रुवारीपर्यंतमंडळाचे प्रमुख पदाधिकारीही उपस्थित राहणारं

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : गुजरात राज्यातील बडोदा येथे मराठी साहित्य संमेलन १६ ते १८ फेबु्रवारी दरम्यान होत आहे़ या ठिकाणी धुळ्यातील राजवाडे संशोधन मंडळाच्या दुर्मिळ प्रकाशनांचा स्टॉल लावण्यात येणार आहे़ अशी माहिती मंडळाचे मुख्य सचिव डॉ़ सर्जेराव भामरे यांनी दिली़ 
९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्यात होत आहे़ राजवाडे यांच्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने राजवाडे मंडळाने आपल्या दुर्मिळ आणि वैशिष्ठ्यपुर्ण प्रकाशनांचा स्टॉल लावलेला आहे़ या स्टॉलवर राजवाडे मंडळाची आणि मराठ्याच्या इतिहासाची साधने, छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे, समग्र राजवाडे खंड, शिवाजी महाराजांची राजनिती, वेदांच्या अभ्यासात उपयुक्त निरुक्त, सोर्सेस आॅफ मराठा हिस्ट्री, गिताई धर्मसार, ज्ञानेश्वरी नितीकथा, अमृतानुभव, नवरस रागमाला, योग चिंतामणी, वेडीया नागेश, तात्या जोगाच्या चरित्राची साधने, खानदेश माळव्याच्या इतिहासाची साधने, नागपुरकर भोसल्यांचे चिटणीशी बयान, नागपूर राज्याच्या इतिहासाची साधने - रघुजी प्रथम, मराठा कालिन शासन व्यवस्था आणि स्थित्यंतरे, आणिबाणी चिंता आणि चिंतनाचा विषय यासोबत संशोधक त्रैमासिकाचे दुर्मिळ अंक हे इतिहासप्रेमी अभ्यासकांना उपलब्ध होणार आहेत़ 
मंडळाचे अध्यक्ष मदनलाल मिश्रा, कार्याध्यक्ष संजय मुुंदडा यांच्या मार्गदर्शनात स्टॉल लावण्यात येणार आहे़ त्यांना प्रा़ श्रीपाद नांदेडकर, रोहिदास बोरसे, गुलाब भील हे सहकार्य करीत आहेत़ तर सर्जेराव भामरे, जयश्री शहा, नंदलाल अग्रवाल हे संमेलनात उपस्थित राहतील़ 

Web Title: Rajwade Mandal's Stall in Baroda Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.