धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील सहा केंद्रावर होणार हरभºयाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 03:36 PM2018-03-19T15:36:28+5:302018-03-19T15:36:28+5:30

४४०० रूपये हमीभाव, आॅनलाईन नोंदणी गरजेची

The purchase of Harihana will be done at six centers in Dhule-Nandurbar district | धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील सहा केंद्रावर होणार हरभºयाची खरेदी

धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील सहा केंद्रावर होणार हरभºयाची खरेदी

googlenewsNext
ठळक मुद्देहमीभावाने प्रथमच हरभºयाची खरेदीआॅनलाईनसाठी नोंदणी गरजेचीसहा केंद्रावर होणार खरेदी

आॅनलाइन लोकमत
धुळे : नाफेडच्यावतीने धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सहा केंद्रावर आॅनलाइन पद्धतीने हरभरा खरेदी केली जाणार आहे. साधारणत: १० एप्रिलपासून ही खरेदी सुरू होण्याची शक्यता आहे. आॅनलाइन  नोंदणीबाबत शेतकºयांना कळविण्यात आल्याची माहिती जिल्हा मार्केटींग अधिकारी के.एस. शिंदे यांनी दिली.
राज्य शासन व नार्फेडतर्फे मूग, उडीद, सोयाबीन, तूर  पाठोपाठ आता हरभºयाची आॅनलाइन  खरेदी करण्यात येणार आहे. यात धुळे जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, साक्री, दोंडाईचा येथे तर नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार व शहादा येथे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. साधारणत: एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हमीभावाने खरेदी सुरू होण्याची शक्यता आहे.
हरभºयाची प्रथमच खरेदी
गेल्यावर्षी नाफेडतर्फे आॅनलाईन खरेदी करण्यात आलेला नव्हता. या वर्षी प्रथमच आॅनलाइन  नोंदणी पद्धतीने खरेदी केला जाणार आहे.राज्य शासनाच्यावतीने हरभºयासाठी प्रतिक्विंटल ४२५० हभीभाव व १५० रूपये एकूण ४४०० रूपयांचा भाव जाहीर केलेला आहे.
आॅनलाइन नोंदणीचे आवाहन
हरभºयाची हमीभाव खरेदीसाठी आॅनलाइन  नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा मार्केटींग फेडरेशनतर्फे करण्यात आलेले आहे.
 दरम्यान हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणी करतांना शेतकºयांनी ७-१२ उतारा, बॅँकेचे पासबुक, आधारकार्ड झेरॉक्स, पीकपेरा आदी कागदपत्रे जोडणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.
 ८६९७ क्विंटल तूर खरेदी
धुळे- नंदुरबार जिल्ह्यातील पाच खरेदी केंद्रावर १ फेब्रुवारी २०१८ पासून हमीभावाने तुरीची खरेदी सुरू झाली. १९ मार्च अखेरपर्यंत ८ हजार ६९७ क्विंटल तूर खरेदी करण्यात आलेली आहे. यात धुळे केंद्रावर ५ हजार ५६८, शिरपूरला ५९८, दोंडाईचा येथे ८३७, नंदुरबारला ६३१ तर शहादा येथे १ हजार ६१ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. तुर खरेदी १८ एप्रिलपर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.


 

Web Title: The purchase of Harihana will be done at six centers in Dhule-Nandurbar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.