धुळ्यात पंचायत राज समितीने जाणून घेतल्या समस्या

By admin | Published: July 5, 2017 04:46 PM2017-07-05T16:46:36+5:302017-07-05T16:46:36+5:30

पदाधिका:यांशी चर्चा : सीईओंची सुनावणी

Problems learned by Panchayat Raj committee in Dhule | धुळ्यात पंचायत राज समितीने जाणून घेतल्या समस्या

धुळ्यात पंचायत राज समितीने जाणून घेतल्या समस्या

Next

ऑनलाईन लोकमत

धुळे ,दि.5 - जिल्हा परिषदेच्या दोन वर्षाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी पंचायत राज समिती बुधवारी जिल्ह्यात दाखल झालेली आह़े साक्री रोडवरील सर्किट हाऊसमधील बंद हॉलमध्ये पदाधिका:यांच्या समस्या जाणून घेतल्या असल्याची माहिती समितीचे कार्यकारी प्रमुख प्रकाश भारसाकळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ 
बुधवारपासून तीन दिवसांच्या दौ:यावर पंचायत राज समितीचे पदाधिकारी दाखल झाले आहेत़ या समितीत 23 आमदार असून पैकी 15 आमदारांनी जिल्ह्यात हजेरी लावली आह़े गुलमोहोर आणि सर्किट हाऊस येथे त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आलेली आह़े साक्री रोडवरील सर्किट हाऊस येथे बंद हॉलमध्ये आमदार आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांची बैठक घेण्यात आली़ या बैठकीत स्थानिक अडचणी लोकप्रतिनिधी यांनी समितीसमोर मांडल्या़ समिती प्रमुख भारसाकळे यांनी ते सर्व जाणून घेतल्या आहेत़ यावर विचारले असता त्यांनी अधिक बोलणे टाळत गोपनीय चर्चा असल्याचे स्पष्ट केल़े या बैठकीनंतर जिल्हा परिषदेच्या हॉलमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांची सुनावणी सुरु झालेली आह़े 

Web Title: Problems learned by Panchayat Raj committee in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.