धुळे जिल्ह्यातील शिक्षकांनी सादर केले नवीन संकल्पनांविषयी सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 01:00 PM2018-03-24T13:00:20+5:302018-03-24T13:00:20+5:30

माध्यमिक शिक्षा अभियान, कार्यशाळेत २५० शिक्षकांचा सहभाग

Presentation about new concepts presented by teachers in Dhule district | धुळे जिल्ह्यातील शिक्षकांनी सादर केले नवीन संकल्पनांविषयी सादरीकरण

धुळे जिल्ह्यातील शिक्षकांनी सादर केले नवीन संकल्पनांविषयी सादरीकरण

Next
ठळक मुद्देराष्टÑीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत कार्यशाळातज्ज्ञ शिक्षकांनी केले मार्गदर्शन३२ शिक्षकांनी केले विषयाचे सादरीकरण



आॅनलाइन लोकमत
धुळे : राष्टÑीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत माध्यमिक शिक्षकांची जिल्हास्तरीय कार्यशाळा शैक्षणिक सातत्यपूर्ण व विकास संस्था धुळे येथे शुक्रवारी सकाळी १० ते ५ यावेळेत झाली. या कार्यशाळेत जिल्ह्यातील २५० शिक्षकांनी सहभाग घेतला होता.
दरम्यान यावेळी शिक्षकांनी इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयातील नवीन संकल्पनांविषयी सादरीकरण केले. त्यात इंग्रजीविषयात  स्वाती पाटील, विज्ञानमध्ये जे. डी. भदाणे व गणितात  के.एम. बच्छाव यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
कार्यशाळेचे उदघाटन प्राचार्या डॉ. विद्या पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना डॉ. विद्या पाटील म्हणाल्या, वर्गातील विद्यार्थी प्रगत होण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी शैक्षणिक उपक्रम साहित्याचा वापर करावा. या कार्यशाळेत इंग्रजी, गणित  व विज्ञान या विषयाबद्दल तज्ज्ञ शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
जिल्ह्यातील काही शिक्षक अनेक नवीन उपक्रम राबवितात. त्यांना व्यासपीठ उपलब्ध होवून त्याचा जिल्ह्यात प्रसार व्हावा हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश आहे.
या अंतर्गत गणित विषयाच्या १२, विज्ञान व इंग्रजीच्या प्रत्येकी १०-१० शिक्षकांनी आपापल्या विषयाचे  सादरीकरण केले. परीक्षक म्हणून आर.एस.देवरे, जे.बी. भामरे, बी. बी. पाटील, महाजन यांनी काम पाहिले. यावेळी जिल्हा समन्वयक पी. झेड. कुवर उपस्थित होते. विजय गायकवाड, भारती बेलन, प्रतिभा भावसार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा झाली.
विजेत्यांचा गौरव
नवीन संकल्पना विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी शिक्षकांनी पॉवर पॉर्इंट प्रेझेण्टेशनद्वारे आपल्या विषयांचे सादरीकरण केले.
 यात इंग्रजी विषयात प्रथम स्वाती पाटील, द्वितीय वनमाला साळुंखे, तृतीय महेंद्र भामरे. विज्ञानात प्रथम जे.डी. भदाणे (शिंदखेडा), द्वितीय दिलीप पाटील (पाडळसे), तृतीय शे. गुलाम मुस्तफा (पिंपळनेर).
 गणितात प्रथम के.एस. बच्छाव (साक्री), द्वितीय शीतल पाटील (शिरपूर), तृतीय क्रमांक पी.आर. पाटील (शिंदखेडा) यांनी मिळविला. विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र मान्यवरांच्याहस्ते देण्यात आले.


 

 

Web Title: Presentation about new concepts presented by teachers in Dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.