पंतप्रधान येणार शनिवारी जळगावहून धुळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 10:33 PM2019-02-13T22:33:11+5:302019-02-13T22:34:24+5:30

सभास्थळांची तपासणी : अधिका-यांच्या बैठका सुरु

PM arrives in Dhule from Jalgaon on Saturday | पंतप्रधान येणार शनिवारी जळगावहून धुळ्यात

पंतप्रधान येणार शनिवारी जळगावहून धुळ्यात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगाव येथून हेलिकॉप्टरने शनिवारी धुळ्यात दाखल होणार आहेत़ त्यासाठी मालेगाव रोडवरील गो-शाळेच्या मैदानावर हेलिपॅड तयार करण्यात आले आहे़ 
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी दुपारी सव्वा बारा वाजता हेलिकॉप्टरने पांढरकवडा येथून नागपूर येथे दुपारी १ वाजून ५ मिनीटांनी पोहचतील़ १ वाजून १० मिनीटांनी नागपूर विमानतळावरुन हेलिकॉप्टरने जळगाव येथे १ वाजून ५५ मिनीटांनी येतील़ लगेच दुपारी २ वाजता ते धुळ्याकडे हेलिकॉप्टरने निघतील आणि दुपारी २ वाजून ४० मिनीटांनी धुळ्यात पोहचतील़ २ वाजून ४५ मिनीटांनी धुळ्यातील हेलिपॅडवर उतरुन २ वाजून ५० मिनीटांनी सभास्थळी पोहचतील़ दुपारी २ वाजून ५० ते ३ वाजून ३५ मिनीटांपर्यंत ते सभास्थळी उपस्थित राहतील़ त्यानंतर ते ३ वाजून ५० मिनीटांनी हेलिकॉप्टरने मध्यप्रदेशाकडे रवाना होतील़ 

Web Title: PM arrives in Dhule from Jalgaon on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.