मोकाट कुत्र्यांपुढे महापालिका हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 11:14 AM2019-05-18T11:14:49+5:302019-05-18T11:20:16+5:30

महापालिका : कुत्र्यांच्या झुंडींचा सुळसुळाट; उपाययोजना होत नसल्याने नाराजी

Mokat kumar prodhesh municipal hatlabal | मोकाट कुत्र्यांपुढे महापालिका हतबल

dhule

Next
ठळक मुद्देसंख्या वाढीचे कारणेभटकी कुत्री पकडण्यास प्राणीमित्रांचा विरोधएक मादी सात ते आठ पिलांना जन्म देतेकुत्रे पकडणाºया वाहनाचा वास येतो, म्हणून कुत्रे पळून जातात़पकडण्याची प्रक्रिया   नागरिकांच्या तक्रारीनंतर कुत्रे पकडणेगळ्यात पट्टा नसलेले कुत्रे पकडणे कुत्र्याच्या कानाला खूण केलेली असल्यास निर्बीजीकरण झालेले कुत्रे पकडत नाही़ निर्बीजीकरणानंतर कुत्र्यांना पुन्हा सोडण्यात येते़निर्णय विचाराधीन  भटके कुत्र्यांचा बंदोबस्त लावण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून श्वान निबीर्जीकरण करण्याचा निर्णय विचाराधीन आहे़ - आर्थिक खर्च अधिक असल्याने अडचण असल्याचे सुत्रांनी सांगितली़

 धुळे :  शहरात गेल्या काही वषार्पासुन भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांचे अडचणीला सामोरे जावे लागत आहे़ मनपाकडे प्रशासनाकडून उपाय-योजना नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे़
भटक्या कुत्र्यांचा हा त्रास आता त्यांच्या चाव्यांमुळे तसेच रात्रीच्या वेळी एकटादुकटाच्या अंगावर धावून जाण्यामुळे जीवघेणा ठरू लागल्याने  रात्रीच्या वेळी रस्त्यावरून कामावर येणारे-जाणारे नोकरदारासी बस व रेल्वे स्थानकांवरून प्रवास करणाºया प्रवाशांना भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाला रोज सामोरे जावे लागत आहे़  घरासमोर खेळणा-या लहान मुलांचे लचके तोडण्यापासून रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांवर हल्ले देखील होत आहे़
भटक्या कुत्र्यांची दहशत सुरूच
भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली आहे. भटक्या कुत्र्यांच्या संख्येवरवर नियंत्रण ठेवण्यात पालिका हतबल होताना दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये पालिका प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे आता भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणा बाहेर गेली आहे. याचाच त्रास सामान्यांना सहन करावा लागत आहे. 
 गल्लो-गल्लीत भटक्या कुत्र्यांचे टोळके फिरताना दिसत आहे. भटक्या कुत्र्यांचे हल्लेही लोकांवर दिवसेंदिव वाढतच चालले आहेत. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला यांना रस्त्यावरून चालणे भटक्या कुत्र्यांनी कठीण केले आहे. शहराच्या काही भागात नाक्या-नाक्यावर रात्रीच्या वेळेस चोरांसारखे भटके कुत्रे अगदी टोळीने उभे असतात. दुचाकी आली की त्यांच्या मागे हे कुत्रे एका मागून एक धावू लागतात. यामुळे अपघातही घडले आहेत. 
श्वान निबीर्जीकरण नाही 
श्वानांच्या निर्बिजीकरणाचा ठेका २००९-१० या कालावधीत कराड येथील एका संस्थेला देण्यात आला होता़ दहा वर्षात वाढलेल्या श्वानांची संख्या पाहता नसबंदी झालेल्या श्वानांची संख्या अत्यल्प होती़ एक पशुवैद्यक जास्तीत जास्त सात नर व चार माद्यांची शस्त्रक्रिया करू शकतो़ या हिशेबाने २२ श्वानांची निर्बिजीकरण शस्त्रक्रिया मान्य होऊ शकत नाही, असे लेखापरीक्षक अहवालात नमुद केले़ मनपा श्वान निबीर्जीकरण करण्याची प्रक्रिया बंद झाल्याने कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे़  
पाच हजार भटकी कुत्रे 
निबीर्जीकरणाच्या प्रक्रियेसाठी  अधिक खर्च होतो़ त्यामुळे सध्या पाच हजाराहून अधिक भटके कुत्र्यांची संख्या आहे़ 
मोहीम नावालाच 
श्वान निबीर्जीकरणासाठी  महापालिकेकडे स्वंतत्र विभागाची गरज आहे़ मात्र वैद्यकीय अधिकारीसह पारिचारिकांच्या जागा रिक्त आहे. भटक्या कुत्र्यांवर वेळीच निबीर्जीकरणाची शस्त्रक्रिया करता यावी यासाठी श्वानांना पकडण्यासाठी  स्वान वाहने देखील उपलब्ध नाही़ त्यामुळे महापालिकेच्या हद्दीतील कुत्रे पकडण्याची मोहीम फक्त नावालाच आहे़ 





 

Web Title: Mokat kumar prodhesh municipal hatlabal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे